१३ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना
By Admin | Updated: October 29, 2014 00:17 IST2014-10-29T00:17:42+5:302014-10-29T00:17:42+5:30
मलकापूर शहरवासीयांची पाणी समस्या कायमच.

१३ कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना
हनुमान जगताप / मलकापूर
गेल्या अनेक वर्षांपासून मलकापूरची पाणी समस्या कायम ती कायमच आहे. अशात पाऊण लाख नागरिकांना पालिका अखत्यारीतील १३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार योजना कागदोपत्री औपचारिकतेत गुंतली आहे. परिणामी, त्या कामास गती यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर नगरीचे सुमारे पाऊण लाख नागरिक गेली अनेक वर्षांपासून पाणी समस्येने हैराण आहेत.
मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. त्यामुळे शहरातील सुमारे पाऊण लाख नागरिकांना सदर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाण्याची प्रतीक्षा लागली आहे. कारण दुसरीकडे शहरातील पाणी पुरवठय़ाची अवस्था जैसे थे आहे. दरम्यान निवडणुका झाल्या. आचारसंहिता संपली. त्यामुळे मलकापूरसाठीच्या त्या योजनेची धडाक्यात सुरुवात व्हावी, अशी शहरातील नागरिकांची अपेक्षा आता पुढे येवू लागली आहे.
राज्य शासनाच्या महाराष्ट्र सुजल पाणीपुरवठा योजनेतून पक्ष नेत्यांच्या पाठपुराव्यातून नगरासाठी १३ कोटींची योजना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मंजूर केली. त्यामुळे लवकरच त्या योजनेचे काम सुरू होणार असल्याचे मलकापूर नगराध्यक्ष मंगलाताई पाटील यांनी सांगीतले.
*पंधरा दिवसाआड पाणी
शहरात ८ ते १0 दिवसाआड तर अनेक भागात १५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. यामुळे नागरिकांना पाणीसाठवण कशी करावी, असा प्रश्न पडतो. तर निश्चित वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भटकंती करावी लागते. नाइलाजाने अनेकवेळा दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे.