रोपवाटिकांच्या आधुनिकीकरणासाठी एक कोटी १३ लक्ष रूपयांचा निधी

By Admin | Updated: June 17, 2015 01:37 IST2015-06-17T01:37:14+5:302015-06-17T01:37:14+5:30

राज्य शासनाचा निणर्य.

13 crore rupees for modernization of nurseries | रोपवाटिकांच्या आधुनिकीकरणासाठी एक कोटी १३ लक्ष रूपयांचा निधी

रोपवाटिकांच्या आधुनिकीकरणासाठी एक कोटी १३ लक्ष रूपयांचा निधी

खामगाव (बुलडाणा): वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या कामाला गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकांचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरणासाठी एक कोटी १३ लक्ष रुपयांच्या अनुदान वितरणास सोमवार, १५ जून रोजी मंजुरी देण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातर्फे राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या रोपवाटिकांमध्ये विविध झाडांची रोपं तयार केली जातात; मात्र गत काही दिवसांपासून या रोपवाटिकांचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरण रखडले होते. त्यामुळे २0१५-१६ या वर्षाकरीता सामाजिक वनीकरण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकांचे बळकटीकरण व आधुनिकीकरण या योजनेसाठी जवळपास १ कोटी ६१ लक्ष रुपयांची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यापैकी एप्रिल२0१५ ते नोव्हेंबर २0१५ या आठ महिन्यांच्या कालावधीसाठी १ कोटी १३ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Web Title: 13 crore rupees for modernization of nurseries