१३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द

By Admin | Updated: May 7, 2015 01:12 IST2015-05-07T01:12:55+5:302015-05-07T01:12:55+5:30

खामगाव तालुक्यातील बोगस रेशन कार्ड प्रकरण.

13 cheaper food grain licenses canceled | १३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द

१३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द

खामगाव : तालुक्यातील बोगस रेशन कार्डचे प्रकरण गाजत असताना १३ स्वस्त धान्य दुकानाचे परवाने रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. ११ ए िप्रल रोजी तत्कालीन पुरवठा अधिकारी एस. बी. भराडी यांनी सदर दुकानांची त पासणी केल्यानंतर ३0 एप्रिलला ही कारवाई केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर परवाने रद्द करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जाते.
पंतप्रधानासह मुख्यमंत्री व काही मंत्र्यांच्या नावे बोगस रेशन कार्ड बनविल्याचे प्रकरण विधान परिषदेचे सदस्य पांडुरंग फुंडकर यांनी विधिमंडळात गाजविले होते. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पुरवठा अधिकारी एस. बी भराडी यांनी खामगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानाला भेटी देऊन चौकशी केली. डी-वन रजिस्टर त पासण्यात आले असता, स्वस्त धान्य दुकानदारनिहाय वितरित केलेल्या शिधा पत्रिकांसंदर्भात अद्ययावत अभिलेख आढळून आले नाही. सखोल चौकशीअंती परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांच्या नावे असलेले दुकान ते स्वत: चालवत नसून, अनधिकृतपणे दुसराच व्यक्ती चालवत असल्याचे आढळले. त्यामुळे शासन निर्णय १२ नोव्हेंबर १९९१ मधील परिच्छद ४ नुसार स्वस्त धान्य दुकानाचा परवाना असणार्‍यांनी स्वत: रेशन दुकान चालविणे बंधनकारक असताना त्यांनी अन्य व्य क्तीला दुकानाची सूत्रे देऊन याप्रकरणी शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी १३ स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आल.

Web Title: 13 cheaper food grain licenses canceled