रस्त्यांसाठी १२ कोटी रुपये मंजूर

By Admin | Updated: March 19, 2017 02:26 IST2017-03-19T02:26:44+5:302017-03-19T02:26:44+5:30

सिंदखेड राजा मतदारसंघाचा अनुशेष; रस्त्यांसाठी मिळणार निधी.

12 crores sanctioned for roads | रस्त्यांसाठी १२ कोटी रुपये मंजूर

रस्त्यांसाठी १२ कोटी रुपये मंजूर

सिंदखेड राजा, दि. १८- मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १२ कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. यासाठी या मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
सिंदखेड राजा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्याचा प्रवाशांसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होत होता. तसेच अंतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला होता. या मतदारसंघातील अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड या रस्त्यावरील १0 कि.मी. रस्ता, सिनगाव जहाँगीर, मेहुणाराजा, रोहणाफाटा, उमरद, आडगाव राजा रस्त्यावरील १0 कि.मी. रस्ता, मलगी इसरूळ, देऊळगाव मही रस्त्यावरील १0 कि.मी.रस्ता तसेच माळसावरगाव धांदरवाडी, वर्दडी बु. चांगेफळ, असा एकूण ४0 कि.मी. रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण २0१७-१८ मध्ये होणार असल्याची माहिती आमदार खेडेकर यांचे स्वीय सहायक शिंगणे यांनी दिली.

या कामांचा समावेश
1) अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे. कि.मी.१४३/00 ते १५२/00 एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी रू.
2) सिनगाव जहाँगीर, मेहुणा राजा, रोहणा फाटा, किनगाव राजा, उमरद, आडगाव राजा. एकूण ३७ कि.मी. 0/00 ते १0 ची रूंदीकरणासह सुधारणा करणे एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी.
3) मलगी, इसरूळ, दे.मही.एकूण ३0 कि.मी. ५/00 ते ९/00 व १0/00 ते १६/00 रूंदीकरणासह सुधारणा करणे एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी
4) माळसावरगाव, धांदरवाडी, वर्दडी बु., चांगेफळ रस्ता एकूण ३९ किमी २४ ते ३४.00 ची सुधारणा करणे, एकूण १0 कि.मी.     ३.00 कोटी रू.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एकूण ४0 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. सदर रस्ते मंजूर झाल्यामुळे सि.राजा वि.स.म.संघातील रस्त्यांना चांगले दिवस येतील.
- डॉ. शशिकांत खेडेकर
आमदार, सिंदखेड राजा

Web Title: 12 crores sanctioned for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.