शेतकरी अपघात विमा योजनेत ११७ प्रकरणे अडकली त्रुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:41+5:302021-03-04T05:04:41+5:30

२०१६-१७ ते २०१९-२० या वर्षातील आढावा दाखल प्रस्ताव ५६५ मंजूर २८३ नामंजूर ११७ प्रक्रियेत १६५ कोणाला किती मिळते ...

117 cases stuck in error in farmers accident insurance scheme | शेतकरी अपघात विमा योजनेत ११७ प्रकरणे अडकली त्रुटीत

शेतकरी अपघात विमा योजनेत ११७ प्रकरणे अडकली त्रुटीत

२०१६-१७ ते २०१९-२० या वर्षातील आढावा

दाखल प्रस्ताव ५६५

मंजूर २८३

नामंजूर ११७

प्रक्रियेत १६५

कोणाला किती मिळते मदत

अपघातामुळे मदत झाल्यास २ लाख रुपये, दोन डोळे, दोन हात, दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.

सर्वाधिक प्रकरणे

शेतकरी अपघात विमा योजनेत सर्वाधिक प्रकरणे ही विजेचा धक्का, सर्पदंशाची राहत आहेत. त्यानंतर रस्ता अपघात व वाहन अपघाताची प्रकरणेही मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

प्रस्ताव प्रलंबित का

विविध त्रुट्यांमुळे हे प्रस्ताव प्रलंबित राहत आहेत. सातबारा उतारा, मृत्यू दाखला, प्रथम माहिती अहवाल, घटनास्थळ पंचनामा, वयाचा दाखला, यासह विविध कागदपत्रे अर्जासोबत आवश्यक असतात. परंतू कागदपत्रामध्ये त्रुटी आढळून येत असल्याने प्रस्ताव प्रलंबित राहतात.

Web Title: 117 cases stuck in error in farmers accident insurance scheme