शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी योजनेचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:01 IST

बुलडाणा : राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढल्याचा सिकलसेलग्रस्तांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे कुटुंबीयांसह जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना आर्थिक हातभार मिळणार आहे.

ठळक मुद्देयोजनेची व्याप्ती वाढल्याचा फायदा १८ वर्षांखालील रुग्णांचे प्रस्ताव प्रस्तावित!

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढल्याचा सिकलसेलग्रस्तांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे कुटुंबीयांसह जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना आर्थिक हातभार मिळणार आहे.संजय गांधी निराधार योजनेत अनेक सुधारणा करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचे आदेश  सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. यापूर्वी कुटुंबीयांचा आधार नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनांच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम मिळत होती. आता नवीन बदलानुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे कुटुंबीयांसह  सिकलसेलग्रस्तांना  या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन २0११ ते २0१७ दरम्यान जिल्ह्यात १३ तालुक्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १९0 सिकलसेलग्रस्त रुग्ण आहेत.  त्यात बुलडाणा तालुक्यातील ३५, चिखली १८, देऊळगाव राजा ११, सिंदखेड राजा २, मेहकर १0, लोणार ८, खामगाव ३२, शेगाव १२, संग्रामपूर १५, जळगाव जामोद ५, नांदूरा ६, मलकापूर २0 व मोताळा तालुक्यात १५ असे एकूण १९0 सिकलसेलग्रस्त आहेत. त्यापैकी १८ वर्षावरील ११५ सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात  येत आहे.

१८ वर्षाखालील ७५ रुग्णजिल्ह्यात १९0 सिकलसेलग्रस्त असून, त्यापैकी ७५ सिकलसेलग्रस्त १८ वर्षाखालील असल्यामुळे त्यांचे प्रस्ताव पालकांच्या संमतीने संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार्‍या ११५ सिकलसेलग्रस्तांसोबत १८ वर्षांखालील उर्वरित ७५ सिकसेलग्रस्तांना भविष्यात लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य