तिसऱ्या दिवशी ११३६ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:43 IST2020-12-30T04:43:33+5:302020-12-30T04:43:33+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबर राेजी एक हजार ...

तिसऱ्या दिवशी ११३६ उमेदवारी अर्ज दाखल
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. २८ डिसेंबर राेजी एक हजार ११८ उमेदवारांनी एक हजार १३६ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३० डिसेंबर अंतिम तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या दाेन दिवसात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तसेच २४ डिसेंबर राेजी ८३ उमेदवारांनी ८८ अर्ज दाखल केले हाेते. तीन दिवस सलग सुट्या आल्यानंतर २८ डिसेंबर राेजी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली हाेती. बुलडाणा तालुक्यातील १९४ उमेदवारांनी १९६, चिखली तालुक्यातील १३७ उमेदवारांनी १४०, देउळगाव राजा ३७ उमेदवारांनी ४१, सिंदखेडराजा ५३ उमेदवारांनी ५५, मेहकर ६७ उमेदवारांनी ६७, लाेणार ९ उमेदवारांनी ९, खामगाव १७० उमेदवारांनी १७३, शेगाव ५० उमेदवारांनी ५१, जळगाव जामाेद ६४ उमेदवारांनी ६४, संग्रामपूर २३ उमेदवारांनी २३, मलकापूर २८ उमेदवारांनी २८, नांदुरा २०१ उमेदवारांनी २०४ तर माेताळा तालुक्यातील ८५ उमेदवारांनी ८५ अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चार हजार ७५१ जागांसाठी एक हजार २२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २९ आणि ३० डिसेंबर अंतिम तारीख असल्याने दाेन दिवसात उमेदवारांची गर्दी वाढणार आहे. ३१ डिसेंबर राेजी अर्जांची छाननी हाेणार असून, ४ जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.