११0 घरांतील विद्युत साहित्य जळाले
By Admin | Updated: December 8, 2014 01:31 IST2014-12-08T01:31:26+5:302014-12-08T01:31:26+5:30
आडविहीर जास्त विद्युतदाबामुळे नुकसान.

११0 घरांतील विद्युत साहित्य जळाले
मोताळा (बुलडाणा) : विजेच्या जास्तीच्या प्रवाहामुळे आडविहीर येथील जवळपास ११0 घरां तील टीव्ही, पंखे, लाईटसहित इतरही वस्तू जळाल्याची घटना ६ डिसेंबरच्या रात्री ७ वाजताच्या दरम्यान घडली. त्यामुळे अगोदरच कमी विद्युत दाबाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे; मात्र अचानक आलेल्या या जास्तीच्या वीज दाबामुळे नागरिकांच्या घरातील महागड्या इलेक्ट्रिक उपकरणाचे नुकसान झाले. आडविहीर या गावात ४५0 घरे असून, या सर्व घरांना दोन ट्रान्सफार्मरवरून विजेचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे गावात गत एक वर्षापासून कमी वीजदबाच्या समस्येला समोर जावे लाग त आहे. यामुळे बर्याच वेळा घरातीती सर्व विद्युत उपकरणे बंद राहतात; मात्र बर्याच वेळा विद्यु त दाब वाढल्यामुळे घरातील वीज उपकरणासह शेतातील कृषी पंपालाही धोका निर्माण होते. गेल्या १५ दिवसाअगोदरच शिवारातील किसन चांडक यांच्या शेतातील ट्रान्सफार्मर अचानक जळाले होते. चार दिवसपर्यंत वीज वितरण कंपनीकडे नवीन ट्रान्सफार्मर मिळण्याकरिता नुकसानग्रस्त शेतकर्याने चकरा मारल्या. यानंतर वीज कंपनीने शेतात ट्रान्सफार्मर बसविले. या नवीन बसविलेल्या ट्रान्सफार्मरवरूनच गावातील दोन चक्क्यासहित ११0 ग्राहकांना विजेचे कनेक्शन देण्यात आले आहे. शनिवार ६ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान या नवीन बसविलेल्या ट्रान्सफार्मरमधून जास्त दाबाचा विद्युत प्रवाह वीज ग्राहकांना मिळाला. अचानक वाढलेल्या वीज दाबामुळे घरा तील टीव्ही, पंखे, ट्युब, रिसीव्हर, सीएफएल बल्ब, कॉम्प्युटरसह इतरही इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळाल्या. त्यामुळे या ११0 घरांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.