डोणगाव येथे ११ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:53 IST2017-09-18T00:52:54+5:302017-09-18T00:53:52+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोणगाव येथे १७  सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता गोपनीय माहितीवरून  छापा  मारून १0 लाख ७२ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

11 lakhs of gutka seized at Donegaon | डोणगाव येथे ११ लाखांचा गुटखा जप्त

डोणगाव येथे ११ लाखांचा गुटखा जप्त

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे ५ वाजता मारला छापा१८0 पोते गुटखा जप्त, दोघांना अटक


लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोणगाव येथे १७  सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता गोपनीय माहितीवरून  छापा  मारून १0 लाख ७२ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, अप्पर  पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे  शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांना गोपनीय  माहिती मिळाली की, डोणगाव येथे वार्ड नं.१ व इंदिरा  नगरमध्ये शेख नईम व सचिन साखळकर यांनी गुटखा  साठवून ठेवला आहे. यावर सदर व्यक्तीच्या गोडावूनवर छा पा टाकला असता तिथे वेगवेगळ्या कंपनीचा १८0 पोते  गुटखा किंमत १0 लाख ७२ हजार मिळून आला.
 सदर गुटख्याबाबत चौकशी केली असता सदर गुटखा  खामगाव येथील नीलेश राठी यांच्याकडून आणल्याचे आरो पींनी सांगितले. सदर छाप्यामध्ये सपोनि मनोज केदारे,  सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारी, पोहेकॉ  अत्ताउल्लाखान, पोहेकॉ अविनाश जाधव, पोकॉ संदीप मोरे,  पोकॉ पवन मखमले व गजानन शेळके यांनी सहभाग घेतला  होता. सदर जप्त केलेला गुटखा व आरोपी अन्न सुरक्षा  अधिकारी यांच्या ताब्यात दिले असून, पुढील कारवाई अन्न  सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे करीत आहेत. 

Web Title: 11 lakhs of gutka seized at Donegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.