११ उमेदवारांनी आतापर्यंत केला १८ लाख रुपये खर्च
By Admin | Updated: October 11, 2014 23:20 IST2014-10-11T23:20:59+5:302014-10-11T23:20:59+5:30
खामगाव मतदारसंघात प्रचारासाठी १३४ प्रचार वाहनं.

११ उमेदवारांनी आतापर्यंत केला १८ लाख रुपये खर्च
खामगाव : विधानसभा मतदार संघातील एकूण ११ उमेदवारांनी काल १0 ऑक्टोबरपर्यंत एकूण १८ लाख ६५ हजार ४५२ रुपये खर्च निवडणुकीत केला आहे. तर प्रचारकामी या उमेदवारांची एकूण १३४ वाहने मतदार संघात फिरत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला २५ लाखापर्यंत खर्चाची र्मयादा निवडणूक आयोगाने दिली आहे. मात्र खामगाव मतदार संघातील एकूण ११ उमेदवारांचा आज पर्यंतचा सर्वांचा एकूण खर्च त्यापेक्षाही कमी असलेल्या दाखविण्यात आलेल्या खर्चावरुन दिसून येत आहे. यामध्ये भाराकाँचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांनी ६ लाख २६ हजार ४0६ रुपये, भाजपाचे अँड.आकाश फुंडकर यांनी १२ लाख २ हजार ६१७, भारिप-बमसंचे अशोक सोनोने यांनी ७ लाख ८0 हजार ८0३ रुपये, राकाँचे नानाभाऊ कोकरे यांनी १ लाख ३७ हजार २९५ रुपये, बुढनखा अब्बासखा यांनी ५१ हजार ३७0 रुपये, शिवसेनेचे हरिदास हुरसाड यांनी ६७ हजार ९५ रुपये, अपक्ष प्रता प वानखडे ५७२0, हिंदू महासभेचे संकेत शेळके यांनी २७ हजार ७९0 रुपये, मो.हसन यांनी २३ हजार १५0, मो.ईरफान यांनी १0 हजार ६८0, अपक्ष श्याम शर्मा यांनी १२ हजार ५२६ रुपये असे एकूण ११ उमेदवारांनी आज १0 ऑक्टोबरपर्यंत एकूण १८ लाख ६५ हजार ४५२ रुपये खर्च केला आहे. तर यापेक्षाही अधिक खर्च येत्या ५ दिवसांत या उमेदवारांकडून होण्याची शक्यता आहे.