शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यात ११ बसची तोडफोड; ९१ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:31 IST

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्‍या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देएसटी बससवर दगडफेक नुकसानात सर्वाधिक बस मेहकर आगाराच्या

बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११  बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसमध्ये मेहकर आगाराच्या सर्वाधिक म्हणजे चार बसचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश बसफेर्‍या खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आल्या होत्या. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी  मंगळवारी दगडफेड झाली. या दगडफेकीमध्ये   राज्य परिवहन महामंडळाच्या  बुलडाणा विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण नऊ एसटी बस फोडल्याने जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मेहकर आगाराची मेहकर ते पुणे जाणार्‍या एम.एच. ४0 ए.क्यू. ६२७२ क्रमांकाच्या बसच्या देऊळगाव राजा येथे काचा फोडल्या. मेहकर आगाराचीच पुणे ते मेहकर एम. एच. ४0 एक्यू ६७८६ क्रमांकाची बस देऊळगाव राजा येथे, लोणार ते त्र्यंबकेश्‍वर एम. एच. ४0 वाय. ५७५0 क्रमांकाच्या बसचा समोरचा काच व खिडकी नंदापूर फाट्यावर फोडण्यात आली. लोणार ते पुणे या बसचेही नुकसान झाले. चिखली ते काठोडा (एम.एच.४0 एन.९९२४), मलकापूर ते औरंगाबाद, नळकुंड ते बुलडाणा धावणार्‍या दोन बसचेही नुकसान झाले. अकोला ते नाशिक एम.एच.१४ बी.टी. ३२७४ क्रमांकाची बस पिंप्री गवळी फाट्यावर फोडल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये मेहकर आगाराच्या बसचे अधिक नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

३३ हजार ६६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले!बस फोडल्यानंतर मेहकर व चिखली आगाराच्या एकूण १५ बसफेर्‍या रद्द करण्यात आल्या. चिखली आगाराच्या १४ बसफेर्‍यांचे १ हजार १0२ कि.मी. अंतर रद्द करण्यात आले. त्यामुळे ३३ हजार ६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर मेहकर आगारच्या एका बसफेरीचे ५२ कि.मी. अंतर रद्द झाल्याने ६00 रुपये उत्पन्न बुडाले, असे मेहकर व चिखली आगाराचे १ हजार १५४ कि.मी. अंतर रद्द झाल्याने ३३ हजार ६६0 रुपयांचे उत्पन्न बुडाले. 

नुकसान झालेल्या ११ बसगाड्या बंद राहणार! मंगळवारी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगाराचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रसंगी उद्या बसगाड्या बंद राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सोबतच ज्या बसगाड्या लांब पल्ल्यासाठी धावत आहे, त्या आहे तेथेच थांबविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळBhima-koregaonभीमा-कोरेगाव