१०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:18 AM2020-12-20T11:18:50+5:302020-12-20T11:18:58+5:30

Buldhana News जिल्ह्यातील १२,२२५ कोरोनाबाधितांना वेळेत  रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका १०८  रुग्णवाहिकेने निभावली आहे. 

108 ambulances provided services to 12 thousand Kovid patients |  १०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा

 १०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोविड संसर्गाच्या गेल्ल्या आठ त महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १२,२२५ कोरोनाबाधितांना वेळेत  रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका १०८  रुग्णवाहिकेने निभावली आहे. 
यासोबतच अपघात, सर्पदंश, प्रसूतीसाठी गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. सर्पदंशाने  गंभीर झालेल्या महिलेवर धावत्या रुग्णवाहिकेतच वेळेवर उपचार करता आल्याने तिचा प्राण वाचविण्यात यश आले होते. असे अनेक प्रसंग आहेत. 
या व्यतिरिक्त डायलिसीसवर असलेल्या परंतु कोरोना झालेल्या रुग्णांना अमरावती, जळगाव खान्देश येथे वेळेत उपचारासाठी पोहोचविण्यात १०८ रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याची माहिती डॉ. राजकुमार तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचेही यामध्ये महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. गेल्या ११ महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातून अकोला, अमरावती येथे रुग्णांना वेळेत पोहोचविण्यासही प्राधान्य दिले.


गंभीर कोविड रुग्णांनाही रुग्णालयात वेळेत पोहोचविले
डायलिसीसवर असलेले आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना अमरावती व जळगाव खान्देश येथील  रुग्णालयात वेळेत पोहोचविण्याचे कठीण व महत्त्वपूर्ण कार्य १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यांत करण्यात आले आहे. दर्जेदार सवेला १०८ रुग्णवाहिकेने प्राधान्य दिलेले आहे.


परिस्थितीनुरूप चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. १०८  रुग्णवाहिकेचा उपक्रम सुरू झाल्यापासून आजर्पंत  १,३१,४३५  जणांना वेळेत रुग्णालयात पोहोचविले. आंतरजिल्हा पातळीवरही गंभीर रुग्ण वेळेत उपचारासाठी पाठविण्यास प्राधान्य दिलेले आहे. 
  -डाॅ. राजकुमार तायडे 
जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका
 

Web Title: 108 ambulances provided services to 12 thousand Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.