बुलडाणा जिल्हा विकास आराखड्यात हवी १00 कोटींची वाढ
By Admin | Updated: January 31, 2015 00:51 IST2015-01-31T00:51:36+5:302015-01-31T00:51:36+5:30
वित्तमंत्र्यांकडे मागणी; ६ फेब्रुवारी रोजी होणार मुंबईत बैठक.

बुलडाणा जिल्हा विकास आराखड्यात हवी १00 कोटींची वाढ
बुलडाणा : जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेंतर्गत १६१ कोटी ४५ लाखाचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील योजना राबविण्यासाठी विविध यंत्रणांना आणखी निधी हवा असल्याने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे १0१ कोटी ७३ लाखाची मागणी करण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात गुरूवार २९ जानेवारी रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणेतील अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत बुलडाणा जिल्ह्याचे सादरीकरण अतिशय उत्तम ठरले. जिल्ह्यासाठी सन २0१५-१६ वर्षासाठी नियोजन विभागाने सर्वसाधारण योजनेची कामल वित्तीय र्मयादा १६१ कोटी ४५ लाख एवढी ठरविली आहे; मात्र विविध यंत्रणेची मागणी २६३ कोटी १८ लाख ८५ हजार एवढी असल्याने शासन निर्देशातील कमाल र्मयादेत विकास आराखडा बसवून मंजूर केला व अतिरिक्त निधीसाठी राज्यस्तरीय बैठकीत प्रस् ताव देण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार अमरावती येथील बैठकीत वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे वाढीव १0१ कोटी ७३ लाखाचा प्रस्ताव देण्यात आला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने वित्तमंत्र्यांनी येत्या ६ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.