१0 हजार मतदारांनी वापरला नकाराधिकार!
By Admin | Updated: May 16, 2014 22:47 IST2014-05-16T22:47:14+5:302014-05-16T22:47:54+5:30
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात १0 हजार ५४५ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.

१0 हजार मतदारांनी वापरला नकाराधिकार!
बुलडाणा : रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक नाही म्हणून १0 हजार ५४५ मतदारांनी नोटा (यापैकी एकही नाही)चा वापर केला. यावर्षी प्रथमच इव्हीएमवर ह्यनोटाह्णचे बटण देण्यात आले होते. ज्यांना कोणत्याच उमेदवाराला मतदान करायचे नाही त्यांच्यासाठी नकाराधिकाराची ही व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली होती. या नकाराधिकाराचाही मतदारांनी पुरेपूर वापर केला. यामध्ये खामगाव विधानसभा मतदार संघ आघाडीवर आहे. या मतदार संघात २१३९ मतदारांनी नोटाच्या बटणाचा वापर केला. त्यापाठोपाठ जळगाव जामोद मतदार संघात १८८९ मतदारांनी कोणताही उमेदवार लायक नाही म्हणून ह्यनोटाह्णचा वापर केला. विशेष म्हणजे जळगाव जामोद मतदार संघ हा आघाडीचे उमेदवार कृष्णराव इंगळे यांचा गृह मतदारसंघ आहे. ते स्वत: जळगाव जा. मध्ये राहतात. तर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर मतदार संघात १७४३ मतदारांनी नकारात्मक मतदान केले. सिंदखेडराजामध्ये १५४३ तर चिखली विधानसभा मतदार संघात १७४३ आणि बुलडाणा विधानसभा मतदार संघात १७१८ मतदारांनी उमेदवारांनी नोटा बटणाचा वापर केला.