१0 हजार चालक-वाहकांची पदे रिक्त
By Admin | Updated: August 3, 2015 01:29 IST2015-08-03T01:29:31+5:302015-08-03T01:29:31+5:30
रिक्त पदांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचे वेळापत्रक कोलमडले.

१0 हजार चालक-वाहकांची पदे रिक्त
मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा) : दैनंदिन प्रवासामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनलेल्या राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकाची राज्यभरात सुमारे १0 हजार पदे रिक्त आहेत. त्यात अमरावती प्रदेश विभागात १६00 चालक-वाहकांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सोडले जाणारे अनेक शेड्युल वेळेवर रद्द होत असून, प्रवासी त्रस्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहकांची पदे रिक्त असल्याने अनेक बसफेर्या वेळेवर रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अवैध वाहतुकीचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा सरळ परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ५0 टक्के सवलतीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिलेली आहे; मात्र अपुर्या बसेसमुळे ज्येष्ठ नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांंनाही खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील आगारांतर्गत सुमारे १0 हजार चालक व वाहकांची पदे रिक्त आहेत. त्यात अमरावती प्रदेश विभागात ८00 चालक व ८00 वाहक अशा एकूण १६00 पदांचा समावेश आहे. तसेच मेहकर आगारात चालकांची १४ पदे तर वाहकाची २९ पदे रिक्त असल्याने अपुर्या कर्मचार्यांच्या संख्येमुळे अनेक वेळा ठरलेली नियतने अचानकपणे रद्द होत आहेत. याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मेहकर आगारात सद्य: परिस्थितीत १८१ वाहक तर २00 चालक कार्यरत आहे. आपले कर्तव्य बजावल्यानंतर पुन्हा अधिकचे कर्तव्य बजावण्यास चालक चाहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नियतणे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता रद्द होतात. परिणामी प्रवाशांना जिवाचा धोका पत्कारून बसेसच्या ट पावर बसून प्रवास करावा लागतो. चालक, वाहकांच्या अपुर्या संख्येमुळे मेहकर आगारप्रमुखांनी आगाराला अधिकचे उत्पन्न देणार्या लोणार-पुणे, मेहकर, पंढरपूर, लोणार, नाशिक, औरंगाबाद यासह अनेक लांब पल्ल्याच्या बसफेर्या बंद केल्याने वर्ष अखेर मेहकर आगाराला तोटाच होणार हे निश्चित. मेहकर आगारात चालक वाहकांप्रमाणेच मेकॅनिकच्या ३८ जागा रिक्त असुन आगाराकडून ग्रामीण भागात प्रवासासाठी रस्त्यावर धावणार्या भंगार बसेस दुरुस्ती होत नाही. शेकडो बसेसची पत्रे निघालेली असून, बसेसमधील सिट फाटलेले आहे. खिडक्यांना काचा नाहीत. दुरुस्ती अभावी या बसेस ऑक्सिजनवर आहेत. यासंदर्भात् महामंडळाचे विभागीय नियंत्रक नितीन मैंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने रिक्त चालक व वाहकांची पदे भरण्याकरिता पुणे येथे संगणकीय ड्रायव्हिंग टेस्टची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. *बुलडाण्यात ३0७ पदे रिक्त बुलडाणा जिल्हय़ात चालक व वाहकांची ३0७ पदे रिक्त असून, त्यात १३८ वाहक व १६९ चालकांची रिक्त पदे आहेत. त्यामुळे अनेक बसफेर्या रद्द होत असून, प्रवासी वर्ग एसटीपासून दुरावत चालला आहे. भंगार अवस्थेतील सर्व बसेस निकामी करून त्या जागी नविन बसेस उ पलब्ध करून द्याव्या. तसेच चालक-वाहकांच्या रिक्त असलेल्या सर्व जागा भरून प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून राज्यस्तरावर चालक वाहकांची मेगा भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी प्रवाशी सेवा संघटनेचे अध्यक्ष शे. उस्मान शे. दाऊद यांनी केली आहे.