१0 हजार उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: July 25, 2015 01:22 IST2015-07-25T01:22:36+5:302015-07-25T01:22:36+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू; तीन हजार उमेदवारांची माघार.

१0 हजार उमेदवार रिंगणात
बुलडाणा : येत्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील ५२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २३ जुलै रोजी ३८0१ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर आता १0,१३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, गावागावांत आता खर्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. खामगाव तालुक्यात सर्वाधिक १४५७ उमेदवार रिंगणात आहेत. त्याखालोखाल चिखली तालुक्यात ११६९, तर १0५८ उमेदवार मोताळा तालुक्यात रिंगणात उरले आहेत. या तीन तालुक्यांमध्ये निवडणुकीची आता खरी रंगत वाढणार आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघण्यास आता सुरुवात झाली आहे. राजकारणाचा पाया असलेल्या या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागातील गावपुढार्यांसाठी राजकीय प्रतिमा निर्माण करण्याची एक संधी असते. त्यासाठी मग खेड्यातील हे राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकते.
बुलडाणा जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, तर २४ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी जिल्हाभरातून १४ हजार ४५५ उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. ४४५ नामांकन अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यानंतर उरलेल्या १४ हजार १0 अर्जांपैकी अर्ज मागे घेण्याच्या २३ जुलै या शेवटच्या तारखेपर्यंत ३ हजार ८0१ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. आता प्रत्यक्ष जिल्हाभरात १0 हजार १३५ उमेदवार रिंगणात उतरले असून, निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या बॅनरखाली लढल्या जात नसल्या तरी जिल्हास्तरीय नेत्यांच्या निगराणीखाली पॅनल करून त्या लढविल्या जातात.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांवर परिणाम होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायतींची निवडणूक गांभीर्याने घेतल्या चित्र दिसत आहे.
तालुका छाननीत मंजूर अर्ज मागे घेतलेले अर्ज शिल्लक
बुलडाणा १६0२ ४७७ १११५
चिखली १६८७ ५१८ ११६९
देऊळगावराजा ७५३ २४५ ५0८
सिंदखेडराजा १00२ २५७ ७३८
मेहकर १0४0 ३७६ ६६४
लोणार ४७९ १३७ ३४२
मलकापूर ७७३ १६९ ६0४
मोताळा १३४0 २८२ १0५८
नांदुरा ११७१ ३३८ ८३३
खामगाव १९४६ ४८९ १४५७
शेगाव ८0६ १७९ ६२७
जळगाव जा. ६९६ १८९ ५0७
संग्रापूर ७१५ १५५ ५१३
एकूण १४0१0 ३८0१ १0१३५