बुलडाणा तालुक्यात १० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:48+5:302021-06-24T04:23:48+5:30

वाढत्या बेफिकिरीने कोरोनाला निमंत्रण बुलडाणा : शहरात अनलॉकनंतर नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. या वाढत्या बेफिकिरीने कोरोना संसर्गाला निमंत्रणच दिले ...

10 positive in Buldana taluka | बुलडाणा तालुक्यात १० पॉझिटिव्ह

बुलडाणा तालुक्यात १० पॉझिटिव्ह

वाढत्या बेफिकिरीने कोरोनाला निमंत्रण

बुलडाणा : शहरात अनलॉकनंतर नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. या वाढत्या बेफिकिरीने कोरोना संसर्गाला निमंत्रणच दिले जात आहे. बाजार परिसरासह बसस्थानकातही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.

पेट्रोल महागल्याने सायकली बाहेर

बुलडाणा : पेट्रोलचे दर वाढल्याने सायकली बाहेर निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा सायकलींची ट्रींग ट्रींग ऐकायला मिळत आहे. सध्या पेट्रोल १०५ रुपये प्रति लीटरने विक्री होत असल्याने सर्वसामान्यांना दुचाकी चालविणे परवडणारे नाही.

हरभरा खरेदीसाठी नोंदणी बंद

बुलडाणा : नाफेडच्यावतीने हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. हरभरा खरेदी करण्यासाठी शासनाने ८ जून ते १८ जूनपर्यंत पुन्हा एकदा शेतकऱ्यांची हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसार नोंदणीचे कामकाज बंद झाले आहे.

१७ गावांना विंधन विहिरींचा आधार

देऊळगाव राजा : पाणीटंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील १७ गावांसाठी विंधन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

Web Title: 10 positive in Buldana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.