१0 मोटारसायकली जप्त
By Admin | Updated: October 13, 2015 23:32 IST2015-10-13T23:32:54+5:302015-10-13T23:32:54+5:30
मेहकर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या धाडी.

१0 मोटारसायकली जप्त
मेहकर (जि. बुलडाणा): बुलडाणा पोलिसांनी मेहकर येथे विविध ठिकाणी धाडी टाकून ४ आरोपींजवळून १0 मोटारसायकली जप्त केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मेहकर शहर व परिसरामधून मोठय़ा प्रमाणात मोटारसायकली चोरी गेल्या होत्या. तर चिखली, सिंदखेडराजा, जालना येथून मोटारसायकली चोरून आणून मेहकर येथे विक्री केल्या होत्या. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा, पोलीस निरीक्षक सूर्यकांत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि आर.एस. सोनवणे, एएसआय डिगांबर अंभोरे, पोहेकॉ केशव नागरे, विकास खानजोडे, सै. हारुन, लक्ष्मण कटक, रघुनाथ जाधव, अत्ताउल्लाखान, नंदकिशोर धांडे, अनिल जाधव, गजानन जाधव आदींनी १३ ऑक्टोबर रोजी मेहकरसह परिसरात विविध ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. त्यामध्ये मोटारसायकल चोरणारे शे. नवाज शे. वाहेद रा. मेहकर व इतर तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून विविध कंपनीच्या १0 मोटारसायकली किंमत अंदाजे ४ लाख ५३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.