१ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: September 1, 2016 02:33 IST2016-09-01T02:33:02+5:302016-09-01T02:33:02+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील बिबी येथील बसस्थानकावरील घटना.

1 lakh 34 thousand rupees lumpas | १ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास

१ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास

बिबी (जि. बुलडाणा), दि. ३१: येथील बसस्थानकावरील चार दुकानांचे शटर व कुलूप तोडून ३0 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३४ हजार रु पयांचा ऐवज लंपास केला.
बिबी येथील सोन्या-चांदीचे दुकान श्रीकृष्ण ज्वेलर्स, साई ज्वेलर्स, बालाजी ज्वेलर्स व सहजराम किराणा दुकान ३0 ऑगस्टच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या चारही दुकानचे शटर्स व कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व किराणा दुकाना तील सामानाची चोरी केली.
ही घटना ३१ ऑगस्टला सकाळी निदर्शनास आली. तक्रारदार आशिष जगदीश रत्नपारखी यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप क्र.४७/१६ कलम ४६१, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार पी.आर. उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मंगेश खडसे, पोकॉ सुभाष गीते, जगदेव टेकाळे करीत आहेत. बुलडाणा येथील ठसे तज्ज्ञ पथकाने ठस्याचे नमुने नेले आहेत.

Web Title: 1 lakh 34 thousand rupees lumpas