१ लाख १५ हजाराचे साहित्य लंपास
By Admin | Updated: August 2, 2014 23:37 IST2014-08-02T23:37:33+5:302014-08-02T23:37:33+5:30
अज्ञात चोरांनी एैवज लंपास केल्याची घटना विविध परिसरात घडली.

१ लाख १५ हजाराचे साहित्य लंपास
बुलडाणा : अज्ञात चोरांनी १ लाख १५ हजार रूपयांचा एैवज लंपास केल्याची घटना ३१ जुलै रोजी मध्यरात्री शहरातील विविध परिसरात घडली. याबाबत व्यंकटेश नगर परिसरातील रहिवासी नंदकिशोर भगवान पडोळ (३९) यांनी शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, बुलडाणा-मलकापूर मार्गावरील बुलडाणा अर्बन रेसिडेंसीच्या समोर उभ्या असलेल्या आपल्या कार क्रमांक एमएच १२ जे.वाय. ६0४४ उभी करून हॉटेल मधे गेले होते. परत बाहेर आले असता कार मधील लैपटॉप किंमत ९२ हजार चोरी गेल्याचे उघड झाले, या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमधे अज्ञात आरोपी विरूध्द भादवि ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुस-या घटनेत विजय कमलाकर तरमळे (३९) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, शहरातील धाड नाका परिसरातील राजपूत ले-आउट येथे घराचे समोर उभ्या ट्रकातील बॅटरी व टामी किंमत २२ हजार रूपयाचे साहित्य लंपास केले.