दोन अपघातात १ ठार; ५ जखमी
By Admin | Updated: December 24, 2014 00:14 IST2014-12-24T00:14:56+5:302014-12-24T00:14:56+5:30
लोणार तालुक्यातील अपघातात एक ठार.

दोन अपघातात १ ठार; ५ जखमी
लोणार/चोरपांग्रा : विविध ठिकाणी घडलेल्या दोन अपघातात १ ठार ५ जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडल्या
लोणार तालुक्यात असलेल्या बिबी जवळील खापरखेड फाट्याजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन १ जण ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली. या अपघातात पिंप्री खंदारे येथील संजु चौधर (३0) हा ठार झाला.
तर खापरखेड येथील मुकेश चव्हाण (१७), गजानन चव्हाण (१७) व पिंप्री येथील आणखी एक जण गंभीर जखमी झाले आहेत. वृत्त लिहिस्तोवर पोलिस तपास सुरु होता. तर दुसर्या घटनेत लोणार तालुक्यातील बिबी नजीक एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली. त्यात भिकाजी रामभाऊ पिंपळे हे गंभीर जखमी झाले. तर संदीप पाडमुख हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारार्थ जालना हलविण्यात आले आहे.