मोटारसायकल अपघातामध्ये १ जण ठार
By Admin | Updated: August 3, 2015 01:19 IST2015-08-03T01:19:53+5:302015-08-03T01:19:53+5:30
म्हशीला धडक बसल्याने मोटर सायकलवरून पडून इसम जागीच ठार.

मोटारसायकल अपघातामध्ये १ जण ठार
नांदुरा (जि. बुलडाणा): म्हशीला धडक बसल्याने मोटर सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना १ ऑगस्टच्या रात्री ८.५५ ला माटोळा शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. लक्ष्मण नारायण खराटे वय ३८ वर्ष रा.माटोळा हे १ ऑगस्टच्या रात्री घरी ग्राम माटोळा येथे मोटार सायकलने जात असताना गावा नजीक अचानक म्हैस रस्त्यावर आली. यावेळी त्यांची मोटार सायकल म्हशीला धडकल्याने ते खाली पडले. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी त्यांना ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे दाखल केले. दरम्यान, या ठिकाणी डॉ.जैस्वाल यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नांदुरा पो.स्टे.ला र्मग दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.हे.कॉ.सुनिल तायडे करीत आहेत. या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बैल आडवा आल्याने अशाच प्रकारे एका युवकाला आपला जीव गमवावा लागला होता.