YouTube Vs TikTok Roast ! सोशल मिडीयावर कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकीचं WAR!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:54 AM2020-05-10T10:54:15+5:302020-05-10T10:55:31+5:30

YouTube Vs TikTok Roast ! टिक टॉक श्रेष्ठ की युट्यूब? वॉर रंगले, मीम्सचा पूर आला... एकदा पाहाच

Why Is Carry minati AND Amir Siddiqui Trending Everywhere? There's a YouTube-TikTok War Raging-ram | YouTube Vs TikTok Roast ! सोशल मिडीयावर कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकीचं WAR!!

YouTube Vs TikTok Roast ! सोशल मिडीयावर कॅरी मिनाटी आणि आमिर सिद्दीकीचं WAR!!

googlenewsNext

ट्विटरवर यावेळी एक युद्ध छेडले आहे. हे युद्ध कुणात होतेय, माहितीये? युटयूब विरूद्ध टिक टॉक. होय, सध्या युट्यूब विरूद्ध टिक टॉक जबरदस्त ट्रेंड होतेय. कारण काय, तर सुप्रसिद्ध व लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटी आणि टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकी यांच्यातील महायुद्ध. कॅरीने एक व्हिडीओ शेअर केला आणि या महायुद्धाला तोंड फुटले. आपल्या या व्हिडीओत कॅरीने आमिरला चांगलेच फैलावर घेतले. यानंतर नेटक-यांनी आमिरची मजा घ्यायला सुरुवात केली. नेटक-यांनी वेगवेगळे भन्नाट मीम्स शेअर करण्याचा सपाटा लावला. हे मीम्स सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

या महायुद्धाची सुरुवात कशी झाली तर सर्वप्रथम आमिर सिद्दीकीने एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने सर्व युट्यूबर्सची खिल्ली उडवली. आम्ही टिक टॉक स्टार युट्यूबर्सपेक्षा कसे श्रेष्ठ हे त्याने या व्हिडीओत छातीठोकपणे सांगितले.
हा व्हिडीओ कॅरी मिनाटीने पाहिला आणि त्याला राहावले नाही. मग काय, कॅरीने आमिरची अशी काही खिल्ली उडवली की, त्याचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला. हे मीम्स पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.

 

Web Title: Why Is Carry minati AND Amir Siddiqui Trending Everywhere? There's a YouTube-TikTok War Raging-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.