वाघिणीच्या हल्ल्यातील मृत शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:36 IST2017-09-25T00:35:22+5:302017-09-25T00:36:56+5:30
वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकºयाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. माजी आमदार दादाराव केचे, डीएफओ एच.के. त्रिपाठी, आरएफओ अमोल चौधरी यांच्या ....

वाघिणीच्या हल्ल्यातील मृत शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकºयाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. माजी आमदार दादाराव केचे, डीएफओ एच.के. त्रिपाठी, आरएफओ अमोल चौधरी यांच्या उपस्थितीत वडाळा येथील शेतकरी भिवजी गोंडुजी हरले यांच्या कुटुंबियांना ८ लाखाचा धनादेश देण्यात आला.
वडाळा येथील शेतकरी भिवजी हरले यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांना तातडीने मदत मिळावी म्हणून दादाराव केचे यांनी प्रयत्न केले. वडाळा या घटनेने परिसरात वाघिणीची दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीने ब्रम्हपूरी जंगलात असाच उपद्रव केल्याने तिला वर्धा जिल्ह्यातील बोर अभयारण्यात आणण्यात आले होते. येथूनही तिने पळ काढला. त्यानंतर या वाघिनीने ेकारंजा वनपरिक्षेत्रात दोन गायी ठार केल्या. त्यानंतर या वाघिणीने लिंगा मांडवी परिसरातील शेतकºयावर हल्ला केला होता. परंतु त्यात ते बचावले. त्यानंतर ही वाघीण तळेगाव (श्या प ) या वनविभाग परिक्षेत्रात दिसली. या वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले मात्र विभागाला यात अपयश आले.
धनादेश देताना जि.प. सदस्य अंकिता होले, प्रशांत काकपुरे, मुकुंद ठाकरे, अशोक विजेकर, सचिन होले, मनोज कोकाटे, प्रविण वाघमारे, भैय्या पोटे, गणेश कोहळे, वडाळा येथील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.