युवा वाचक जोडण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:04 AM2018-09-17T04:04:28+5:302018-09-17T04:05:56+5:30

ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेले मराठी ग्रंथसंग्रहालयाने नुकतेच १२५ वे वर्ष पूर्ण केले.

Challenge to add a young reader | युवा वाचक जोडण्याचे आव्हान

युवा वाचक जोडण्याचे आव्हान

Next

- प्रज्ञा म्हात्रे, ठाणे />
साहित्य संमेलनांच्या निमित्ताने रंगणारे राजकारण पाहिल्यावर अनेकदा राजकीय नेते तोंडात बोटं घालतात. मुरब्बी राजकारण्यांनाही लाजवेल, असे आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक, मतांची पळवापळव साहित्यिक करतात. डोंबिवलीत वर्षभरापूर्वी झालेल्या संमेलनाच्या निमित्ताने हे चित्र दिसले होते. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत फारसे वेगळे चित्र दिसले नाही. मतदारांसमोर ‘विद्यमान’ आणि ‘परिवर्तन’ या दोन्ही पॅनलने एकमेकांवर जाहीरपणे केलेले आरोप, एका राजकीय पक्षाने एका पॅनलला दिलेला छुपा पाठिंबा, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यामुळे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला होता. साहजिकच या निवडणुकीची चर्चा केवळ साहित्य क्षेत्रात नव्हे, तर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातही रंगली होती.
मराठी ग्रंथसंग्रहालयाची २०१८ - १९ ते २०२० - २१ या कालावधीसाठी व्यवस्थापक मंडळ आणि विश्वस्त मंडळाची निवडणूक मागील रविवारी ग्रंथसंग्रहालयाच्या मुख्य शाखेत पार पडली. २६ पदांसाठी झालेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. काही मंडळींना कार्यकारिणीवर आपण यावे, अशी इच्छा वाटत असल्याने आपले म्हणणे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. आतापर्यंत निवडणूक टाळून परस्पर सहमतीने कार्यकारिणीवरील निवड होत असल्याने, ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक कधी झाली, ते फारसे कुणाला कळत नव्हते. मात्र, विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर परिवर्तनवादी लेखक, कवी, रसिक, वाचक यांनी शड्डू ठोकल्याने पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांनी या निवडणुकीची दखल घेतली. आतापर्यंत लढणाºयांची संख्या जास्त नसल्याने पॅनलची गरज कधी भासली नव्हती. यावेळेस निवडणूक लढणाºयांची संख्या अधिक असल्याने पॅनल तयार केले गेले. निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मतदारांच्या संख्येवर झाला. उमेदवारांच्या वाढत्या संख्येमुळे मतदारांची संख्या यंदा अधिक राहिली. ग्रंथसंग्रहालयाच्या मतदारांमध्ये आतापर्यंत कधी मतदानाचा उत्साह दिसला नाही. आता थेट लढत असल्याने, मतदारांना मतदानाकरिता घेऊन येण्याचे बुथ मॅनेजमेंटचे दर्शन या वेळी दोन्ही पॅनलकडून घडले. प्रत्यक्ष मतदानाला आलेल्या काही मतदारांना काही उमेदवार माहीत नव्हते.
उमेदवार मतदारांना गाठून आपल्याला मत देण्याची विनंती करीत होते, तेव्हा काही मतदारांना हेही रिंगणात असल्याचा साक्षात्कार होत होता. लढत चुरशीची असल्याचे लक्षात आल्यावर, काही उमेदवारांनी पॅनलमध्ये राहूनही गुपचूप आपलाच वैयक्तिक प्रचार केला. त्यामुळे वरकरणी विद्यमान व परिवर्तन पॅनलमध्ये लढत असल्याचे दिसत असले, तरी काही उमेदवार हे अपक्ष, स्वयंभू होते. मतदार उत्स्फूर्तपणे मतदानाला आले की, आणले गेले व आपापले मतदार आणण्याकरिता सरस्वतीच्या या पूजकांनी कशी फिल्डिंग लावली, त्याच्या सुरस कहाण्यांच्या चर्चा
ठाणेकरांच्या मुखी आहेत.
ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेले मराठी ग्रंथसंग्रहालयाने नुकतेच १२५ वे वर्ष पूर्ण केले. या वाचनालयाशी तरुण वाचक जोडले जावे, यासाठी युवा संमेलन, ब्लॉग लेखन स्पर्धा, कथा काव्य स्पर्धा यांसारखे अनेक कार्यक्रम राबविले. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली, परंतु अद्याप तरुण वर्गाकडून हवा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. यामागे सोशल मीडियाचा युवकांवरील वाढता प्रभाव हे कारण असल्याचे पदाधिकारी कबूल करतात. उमेदवारांमध्ये पंचेचाळीशी पूर्ण केलेल्या व त्यापुढील व्यक्तींचा असलेला समावेश हेही तरुणांना या निवडणुकीशी सोयरसुतक नसल्याचे ढळढळीत उदाहरण आहे. १२५व्या वर्षानिमित्त वाचकांसाठी आणि नवीन वाचक जोडले जावे, यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले गेले पाहिजेत.
या वर्षात दहा हजार वाचक या वाचनालयाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले, तरी ते मात्र पूर्ण झालेले नाही. या वर्षात नवीन सभासद दीड हजारांच्या आसपास जोडले गेले आणि यासाठीही पदाधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागली. नव्या ठाण्यातील वाचकांसाठी मोबाइल लायब्ररी सुरू केली आहे. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन सुरू आहे. वाचक वाढावे हा हेतू समोर ठेवून भविष्यात अनेक उपक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून राबविले जाणार आहेत. दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले हे वाचनालय आता वाचकांसाठी पूर्णवेळ सुरू असते. वाचनालयातील दुसºया मजल्यावर खास करून महिला व मुलांना पुस्तके, मासिके तिथेच बसून मोफत वाचण्याची सोय केली आहे. तळमजल्यावर वर्तमानपत्रे वाचण्याची सोय उपलब्ध केली आहे.
या वाचनालयाच्या कारभारात काही त्रुटी असल्या व परिवर्तन पॅनलनी त्यावर बोट ठेवले असले, तरी भविष्यात या त्रुटी दूर करण्याची संधी आहे. निवडणुकीतील मतभेद विसरून दोन्ही पॅनलमधील लेखक, कवी, रसिक एकत्र आले, तर ग्रंथालयाने निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करणे अशक्य नाही.

Web Title: Challenge to add a young reader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.