व्हॉट्सअप बोलण्यापासून....व्हॉट्सअप वायरल मार्केटिंगपर्यंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:14 AM2017-09-03T01:14:31+5:302017-09-03T01:14:57+5:30

बोलण्यासाठी शब्द लागतात... संभाषणासाठी भावनात्मक मने... सेल्ससाठी भावना निर्माण करण्यासाठी, व्हॉट्सअप मार्केटिंग घेऊन येते लाखो नवीन साधने... वायरल मार्केटिंग म्हणजे काय?

Whitesupup speaks ... Whitesupup to viral marketing ... | व्हॉट्सअप बोलण्यापासून....व्हॉट्सअप वायरल मार्केटिंगपर्यंत...

व्हॉट्सअप बोलण्यापासून....व्हॉट्सअप वायरल मार्केटिंगपर्यंत...

Next

-  डॉ.शिवांगी झरकर


बोलण्यासाठी शब्द लागतात... संभाषणासाठी भावनात्मक मने...
सेल्ससाठी भावना निर्माण करण्यासाठी, व्हॉट्सअप मार्केटिंग घेऊन येते लाखो नवीन साधने...
वायरल मार्केटिंग म्हणजे काय?
उद्योगाचे मुख्य अंग म्हणजे मार्केटिंग. मात्र, ९९ टक्के लोक मार्केटिंगमध्येच अयशस्वी होतात, म्हणून ते सेल्स करू शकत नाहीत. मार्केटिंगला आमच्या एमबीएच्या भाषेत स्वीट पॉइझन म्हणजे, गोड विष म्हणतात. कारण कधी-कधी समोरची व्यक्ती जाणून बुजून स्वत:चे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस गळ्यात टाकू इच्छिते आणि आपण सर्व माहिती असूनही हे विष पोटात ढकलतो, पण एकसुध्दा शब्द काढला जात नाही. अशाच ५२ मार्केटिंग प्रकारांमध्ये अजून एक आधुनिक मार्केटिंग मिसळला गेला... ज्याचा स्पीड फार जास्त आहे. त्याचे नाव आहे ‘वायरल मार्केटिंग’. वायरल मार्केटिंग म्हणजे, ज्यामध्ये सर्व डिजिटल साधने वापरली जातात. जसे सोशल मीडिया, डिझिटल मार्केटिंग आणि टीव्ही मीडिया.
वायरल मार्केटिंगमधील मुख्य प्रकार कोणते?
वायरल मार्केटिंग म्हणजे, एखादी गोष्ट प्रकाश झोतासारखी एका बुलेट ट्रेनसारखी फास्ट जाते आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते. असे काहीसे या वायरल मार्केटिंगमध्ये झाले. आधी ई-मेल आणि नंतर एसएमएस हा आविष्कार. जेव्हा कॉम्प्युटर आणि मोबाइल जगभर पसरला, तेव्हापासून जग फार जवळ आले. अचानक प्रसार माध्यमे अधिक जलद झाल्यासारखी भासू लागली आणि याच आधारे मार्केटिंग आणि प्रमोशन भरधाव गाडीप्रमाणे धावू लागले. असे बोलतात, आपल्या बाबांकडे ज्या प्रश्नांची उत्तरे नसतात, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल बाबांकडे अवश्य सापडतात. अशाच एका उद्योग संदर्भातील प्रश्नाला उत्तर मिळाले ... मॉडर्न मार्केटिंग... ई-मार्केटिंग... डिजिटल मार्केटिंग... आणि याच मार्केटिंगचा एक छोटासा भाग म्हणजे, व्हॉट्सअप मार्केटिंग होय!...
मार्केटिंग कसे सुरू झाले?
काही वर्षांपूर्वी एसएमएस आणि ई-मेल मार्केटिंग फार जोरात चालायचे, पण ई-मेल मार्केटिंग सर्वच उद्योगाला लाभले नाही. कारण सर्वच उद्योजक किंवा सामान्य लोक कॉम्प्यूटर साक्षर नसतात आणि एसएमएस मार्केटिंग जे बेस्ट होते, पण त्यालाही शब्दांच्या मर्यादा होत्याच. त्यात नंतर अचानक सरकारचे काही नियम बदलले आणि एसएमएस मार्केटिंग उद्योगाला अवकळा येऊ लागली. आधीच मोजके शब्द आणि त्यात १00 प्रकारचे कायदे आणि नियमावली. यात मार्केटिंगचा मुद्दा दुर्लक्षित झाला आणि त्याचा फटका लाखों उद्योगांना बसला. त्यामुळे आता रामबाण आणि आधुनिक उपाय उपलब्ध आहेत, ते म्हणजे व्हॉट्सअप मार्केटिंग.
याद्वारे आपण नेमके काय करू शकतो?
व्हॉट्सअप हे एकमेव असे ंस्रस्र आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आॅडिओ, व्हिडीओ, पीडीएफ फाइल, वल्डर््स फाइल, पीपीटी प्रेझेंटेशन, फोटोज, टेस्ट मेसेजसह इतर माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवू शकतो.
या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण कोणत्याही बाबींची चौकशी आणि संभाषण करू शकतो.
आपण कोणालाही व्यक्तिगत मेसेज करू शकतो किंवा अंतर्गत स्वरूपात ग्रुप्सवर बोलू शकतो.
अशा प्रकारे व्हॉट्सअप हे एकमेव सॉफ्टवेअर आहे की, ज्याच्या माध्यमातून तुम्ही मार्केटिंग, प्रमोशन, सर्व्हे, सेल्स, जाहिरात आणि सपोर्ट हे सर्व एकत्र व एकाच ठिकाणाहून देऊ शकतात. जर आपल्याला आधुनिक मार्केटिंग अनुसरून मार्केटिंग करायचे असेल, तर व्हॉट्सअपशिवाय हक्काचा आणि मोफत असा कोणताच पर्याय नाही. २१व्या शतकात वेगाला सर्वात जास्त महत्त्व आहे आणि हे वेग डिजिटल मार्केटिंगला एक वळण आणि दिशा देते. वय गट १८ ते २९ वर्षांच्या वयोमर्यादेतील तरुण ४० टक्के स्मार्टफोन वापरतात. त्याचप्रमाणे, ३० ते ४० वर्षे वयोगटातील जनता ६० टक्के स्मार्टफोन आणि विशेषत: व्हॉट्सअप वापरतात. याच गोष्टींचा फायदा आपण सेल्स आणि मार्केटिंगसाठी करून घेऊ शकतो आणि तुम्ही नक्कीच करून घ्या! २ँ्र५ंल्लॅ्र९ं१‘ं१@ॅें्र’.ूङ्मे

व्हॉट्सअपचा उपयोग
ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिससाठी) उत्तम होतो...
- व्हॉट्सअपचा फायदा ग्राहकांशी संभाषण करण्यासाठी फार जास्त होतो.
- व्हॉट्सअपमार्फत व्हॉट्सअप ग्रुप्स करून वायरल मार्केटिंग उत्तमरीत्या होते.
- व्हॉट्सअप मार्केर्टिंगमध्ये ग्रुप्समध्ये बिझनेस शेअर होतो आणि उद्योगासंदर्भातील संपर्क क्रमांक मिळतात.
- व्हॉट्सअपचा फायदा कंपनी प्रॉडक्ट/सर्व्हिसचे मार्केर्टिंग आणि प्रमोशनसाठी खूप प्रमाणात होतो.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्योग कसा वाढवायचा?
- टार्गेट ग्राहकांसोबत तुम्ही उद्योग नातेसंबंध बनवू शकतात आणि क्रॉस सेल्स करू शकतात.
- स्वत:ची ब्रॉडकास्ट यादी करून, एका वेळेला २५३ लोकांपर्यंत उत्पादन किंवा सेवा पोहोचवू शकता.
- व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये इतर लोकांशी बोलून बिझनेस करू शकतात.
- आय-फोन ब्लॅकबेरी, विंडो किंवा अँड्रोइड असा कोणताही प्लॅटफॉर्म असो, व्हॉट्सअप फुकट आहे... जिथे एसएमएसला पैसे जातात, तिथे व्हॉट्सअप मेसेज फुकट आहेत.
- कस्टमर अव्हॅल्युएशन/ग्राहक मूल्यमापन फॉर्म बनवून त्याची लिंक तुम्ही पोस्ट करू शकता.
- स्वत:चे लेख तुम्ही प्रकाशित करू शकता आणि सर्वत्र पाठवू शकता.
- स्वत:चे ई-बुक, ई-न्यूजपेपर प्रकाशित करून सर्वत्र व्हॉट्सअप माध्यमातून पाठवू शकता.
- व्हॉट्सअप माध्यमातून फुकट कोल्ड कॉलिंग करून मार्केर्टिंग करू शकता.
- व्हॉट्सअप सर्व्हे वायरल/प्रकाशित करू शकता.
- तुम्ही स्वत:चे ग्राहक कोणते, याचे व्यवस्थापन करून, त्याप्रमाणे आॅफर्स पोस्ट करू शकता.
- स्वत:चे असंख्य ग्रुप्स बनवून डेटाबेस जमा करून, त्यांना त्या पद्धतीने कॉलिंग करू शकता.
-चाटवर/ग्रुप्समधील लोकांशी समोरासमोर बोलून पर्सनल ब्रँड घडवू शकता.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून सेल्स वाढविण्याची यशस्वी नीती
- जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवरून उद्योगासंदर्भातील मेसेज, फोटो किंवा काही इतर मटेरिअल पाठवितात, तेव्हा तुमच्या मित्र परिवार, नातेवाईक किंवा जुन्या ग्राहकांना पाठविता, तेव्हा समोरच्याला एक दिलासा/समाधान मिळते आणि जवळीक निर्माण होते. त्याचा गोड परिणाम म्हणजे सेल्स.
- या माध्यमातून तुम्ही थेट मोबाइल नंबरशी संधान साधू शकतात. त्यामुळे सलग आणि सहज संभाषण होते.
- आपल्याला हवे ते आणि हवे तेवढे मटेरिअल/माहिती पुस्तक तुम्ही पाठवू शकता, तेही मोफत. त्यामुळे सेल्स पटकन क्लोज होतो.
- ग्राहक सेवा वेगाने मिळते किंवा दिली जाऊ शकते. त्यामुळे सपोर्ट चांगला मिळतो आणि त्यामुळे समोरच्याला तुम्ही उत्कृष्ट वाटून सेल्स होतो.
- जुन्या ग्राहकांना नवीन सवलती देऊन, नवीन सेल्स निर्माण करता येतो.
- नवीन व्हॉट्सअपमध्ये तुम्ही विविध फोटोज स्टेटसमध्ये ठेवून, प्रतिदिन विविध जाहिराती प्रदर्शित करू शकता.
- व्हॉट्सअपमधून बल्क मेसेज पाठवून, तुम्ही सेल्स निर्माण करू शकता.

Web Title: Whitesupup speaks ... Whitesupup to viral marketing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.