इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -लेखमालिका क्र. २ - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 03:42 PM2019-01-03T15:42:20+5:302019-01-03T15:51:38+5:30

संख्यावाचन सोपे व अचूक होण्यासाठी एकक, दशक, शतक स्थानावरुन शतक स्थानानंतर, तसेच त्याच्यापुढे हजारची दोन स्थाने, लक्षची दोन स्थाने आणि कोटीची दोन स्थाने या क्रमाने स्वल्पविराम देऊन अंकांचे गट पाडावेत.

Accountant no. 2 - Component - Reading and writing of numbers up to the issue number | इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -लेखमालिका क्र. २ - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षा -लेखमालिका क्र. २ - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

googlenewsNext
ठळक मुद्देघटक - दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन७०४९६७९ ही संख्या अक्षरी कशी लिहाल?

महत्त्वाचे मुद्दे

 १) संख्यावाचन सोपे व अचूक होण्यासाठी एकक, दशक, शतक स्थानावरुन शतक स्थानानंतर, तसेच त्याच्यापुढे हजारची दोन स्थाने, लक्षची दोन स्थाने आणि कोटीची दोन स्थाने या क्रमाने स्वल्पविराम देऊन अंकांचे गट पाडावेत.

२) स्वल्पविराम देताना दिलेल्या संख्येच्या उजवीकडून डावीकडे असे द्यावेत.

३) दशकोटी व कोटी, दशलक्ष व लक्ष, दशहजार व हजार या स्थानांवरील अंक एकत्र वाचावेत.

सोडविलेली उदाहरणे 

१) ९०६६१५२४ या संख्येचे अचूक वाचन कसे कराल?
१) नव्वद लक्ष सहासष्ट हजार पाचशे चोवीस
२) नव्वद कोटी सहासष्ट हजार एक हजार पाचशे चोवीस
३) नऊ कोटी सहा लक्ष एकसष्ट हजार पाचशे चोवीस
४) नऊ कोटी सहा लक्ष सहा हजार पाचशे चोवीस.

स्पष्टीकरण : दिलेली संख्या मांडणी करुन त्यात उजवीकडून शतक स्थानानंतर स्वल्पविराम द्यावा, त्यानंतर पुढे दोन-दोन स्थानानंतर स्वल्पविराम दिला असता वाचन अचूक होईल.
उदा. ९,०६,६१,५२४ या संख्येचे वाचन नऊ कोटी, सहालक्ष एकसष्ट हजार पाचशे चोवीस.

म्हणून पर्याय क्र. - ३ बरोबर

) नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा (२०१८)
१) ९,००,००९
२) ९०,००,००९
३) ९,००,००,००९
४) ९०,००९

स्पष्टीकरण - नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहिताना दिलेल्या संख्येत दशलक्ष आहे म्हणजे लक्षची दोन स्थाने त्यानंतर हजार दिले नाही म्हणून त्याच्या दोन स्थानात शून्य लिहावे लागेल. शेवटी शतक, दशक, एकक यानुसार एककाच्या स्थानात ९ लिहिले तर शतक व दशक स्थानात शून्य लिहावे लागेल.
म्हणजेच ९०,००,००९ असे लेखन होईल.

पर्याय क्र. २ बरोबर

सरावासाठी प्रश्न 

१) ५ दशलक्ष, १ लक्ष, ० हजार, २ हजार, ५ श.
उदा. ही संख्या खालीलपैकी कोणती?
१) ५१,०२,५३९
२) ५,१२,५३९
३) ५१०,२५३
४) ५०,१०,२५,३९०

२) ७०४९६७९ ही संख्या अक्षरी कशी लिहाल?

१) सत्तर लक्ष एकोणपन्नास हजार सहाशे एकोणसत्तर
२) सात लक्ष एकोणपन्नास हजार सहाशे एकोणऐंशी
३) सात कोटी चार लक्ष नऊ हजार सहाशे एकोणसत्तर
४) सत्तर लक्ष एकोणपन्नास हजार सहाशे एकोणऐशी

३) १०००००२ ही संख्या अक्षरी कशी लिहाल?

१) दहा लक्ष दोन हजार
२) एक कोटी दोन
३) एक लक्ष दोन
४) एक दशलक्ष दोन

४) चार लक्ष ५ दशहजार चाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल?
१) ४,५०,०४०
२) ४,५०४०
३) ४०५४०
४) ४५०४००

५) एक कोटी पाच हजार एक याचे अचूक वाचन कोणते?
१) १,०५,००१
२) १,००,०५,१
३) १,००,००,५०१
४) १,००,०५,१

६) पुढील संख्या अक्षरात लिहा ६००७९
१) सहा हजार एकोणसत्तर
२) सहा लक्ष एकोणऐंशी
३) साठ हजार एकोणऐंशी
४) साठ हजार एकोणसत्तर

७) दहा लाख एक हजार पन्नास या संख्येचे अंकी लेखन = 
१) १००१०५०
२) १०१००५०
३) १०१०००५
४) १०००१०५०

८) दोन कोटी बारा हजार एकशे पाच ही संख्या अंकात लेखन कसे कराल?
१) २०१२०१०५
२) २००१२१०५
३) २००१२०१५
४) २०१२१०५

९) पाच लक्ष पंचावन्न हजार पाच ही संख्या अंकात लिहा
१) ५५५००५
२) ५५५५०५०
३) ५५५०५०५
४) ५५५०५०५०

१०) दहा लक्ष दहा हजार दहा ही संख्या अंकात कशी लिहाल?
१) १०१०१००
२) १०१००१०
३) १००१०१०
४) १०१०००१०

११) १६४५८० ही संख्या अक्षरात खालील पर्यायातून निवडा
१) एक कोटी चौसष्ट हजार पाचशे ऐंशी
२) एक लक्ष चौसष्ट हजार पाचशे ऐंशी
३) एक लक्ष चौसष्ट हजार पाचशे सत्तर
४) एक लक्ष चौसष्ट हजार एक्याऐंशी

१२) सात लक्ष चौतीस हजार सातशे नव्वद ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात.
१) ७,३४,९०
२) ७,३४,७९०
३) ७,३४,७९
४) ७,३४,७९०

१३) तीन कोटी तीस ही संख्या कशी लिहाल?
१) ३,००,३०
२) ३,००,००,०३०
३) ३,००,०३
४) ३,००,३०

१४) ११२०४३९ ही संख्या ओळखा?
१) एक कोटी एक लक्ष वीस हजार चारशे एकोणचाळीस
२) एक कोटी बारा लाख चार हजार एकोणचाळीस
३) अकरा लाख चोवीस हजार एकोणचाळीस
४) एक कोटी बारा लाख चार हजार एकोणचाळीस

१५) एक अब्ज पाच कोटी सहा लाख दोन हजार दहा याचे अंकात लेखन कसे?
१) १,५,०६०२,१०
२) १,०५,०६,०२,००१
३) १,०५,०६,०२,०१०
४) १०,५६,०२,०१०

उत्तरसूची :
१) १ २) ४ ३) ४ ४) १ ५) ४ ६) ३ ७) १ ८) २ ९) १ १०) २ ११) २ १२) ३ १३) २ १४) २ १५) ३

संकलक : तारीश आत्तार
जि. प. शाळा, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ

 

 

Web Title: Accountant no. 2 - Component - Reading and writing of numbers up to the issue number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.