विकासकामांना जि.प. सदस्याचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:42 IST2017-11-25T23:41:26+5:302017-11-25T23:42:14+5:30
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली.

विकासकामांना जि.प. सदस्याचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीचा विकास कार्यक्रम अंतर्गत करावयाच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. परंतु लाखनी व लाखांदूर पंचायत समितीत ठरवून दिलेली कामे करण्यास तेथील जि. प.सदस्य विरोध करीत असल्याचे भजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम यांनी लाखनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
लाखनी पंचायत समिती अंतर्गत मुरमाडी सावरी, खुणारी, रेंगेपार तसेच पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत पिंपळगाव व तिरखुरी येथील कामांना जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे मंजुरी देण्यात आली. परंतु जिल्हा परिषद सदस्य हेमंत कोरे यांनी पं. स. लाखनी अंतर्गत मुरमाडी सावरी, रेंगेपार कोहळी व सेलोटी येथील कामे करू नये असे सांगितले. लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रस्ताव मंजूर करू नयेत असे सांगितल्याने दलित वस्तीत करावयाच्या रस्ते व नाली बांधकामास खीळ बसत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना त्यांना शासनाकडून मिळणाºया मुलभूत सुविधापासून राजकीय द्वेषापायी वंचित ठेवले जात आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी याकडे लक्ष घालून दोषीवर कारवाई करावी व दलित व नवबौद्धांना त्यांच्या सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मंगेश मेश्राम यांनी केली आहे. यावेळी निरज मेश्राम, मंगेश गेडाम, शेषराव वंजारी, राजेश खराबे, पडोळे, गिºहेपुंजे, वंजारी उपस्थित होते.
दलित वस्ती बांधकाम संदर्भात सेलोटी येथील काम सुरू आहे. रेंगेपार कोहळी येथील पाणी पुरवठ्याचा खर्च एमबी प्रमाणे ३९ हजार परत न केल्याने दलित वस्तीचे काम थांबले, मुरमाडी येथील दलित रस्त्याचे बांधकामचे आमदार निधीतून झाले आहे. त्यामुळे हे बांधकाम समाजकल्याण समितीने नामंजूर केला आहे. मंजूर व नामंजूर करण्याचा समाज कल्याण समितीला अधिकारी आहे.
-हेमंत कोरे, जि.प. सदस्य भंडारा.