'झिरी देवस्थान'

By Admin | Updated: March 7, 2016 00:24 IST2016-03-07T00:24:51+5:302016-03-07T00:24:51+5:30

आयुध निर्माणी कारखाण्याच्या परिसरात असलेल्या सह्याद्री टेकडीच्या पर्वत रांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे ...

'Ziri Devasthan' | 'झिरी देवस्थान'

'झिरी देवस्थान'

जवाहरनगर : आयुध निर्माणी कारखाण्याच्या परिसरात असलेल्या सह्याद्री टेकडीच्या पर्वत रांगामध्ये हिरव्या शालुने नटलेल्या कुशीत झिरी येथे भोळ्या शंकराच्या वास्तव्यामुळे धार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे. येथे दरवर्षी विदर्भातील हजारो भाविक दर्शनाकरीता मुक्कामाने येतात.
भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शहापूरपासून दक्षिणेस चार किलोमीटर तर ठाणा पेट्रोलपंपपासून दक्षिणेस सहा किलोमीटर अंतरावर नांदोरा गावाशेजारी सह्याद्री पहाडीच्या हृदयात झिरी हे स्थान आहे. त्या परिसरात टेकड्यांच्या रांगा आहेत. टेकडीच्या रांगामध्ये भोले शंकर यांचे देवस्थान आहे. महाशिवरात्री निमित्त पाच दिवसांपर्यंत भंडारा ते झिरी देवस्थान येथे जाण्यासाठी नांदोरापर्यंत खासगी वाहनांची व्यवस्था असते. यापुर्वी झिरीकरीता भंडारा बस स्थानकापासून एसटी बसची सुविधा होती. मात्र लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे बसेस बंद करण्यात आली.
झिरी देवस्थानातील जमिनीपासून १०० मीटर उंच टेकडीवरील दगडामधून एक पाण्याचा झरा बारमाही वाहत असतो. म्हणून या ठिकाणाला झिरी असे शब्द प्रयोग लावण्यात आले. याठिकाणी दोन पाण्याचे कुंड आहेत, एकाचा वापर पिण्याकरीता तर दुसऱ्या कुंडाचा वापर बाह्य वापराकरीता करण्यात येतो. निसर्गाची अद्भुत किमया दगडातून पाणी पहाडीवर खालच्या तळाला पुरातन काळातील विहीर आहे, जी बाहुली नावाने प्रसिद्ध आहे. या पहाडीच्या कुशीमध्ये शिवपर्वती, राधाकृष्ण, गोरखनाथ, हनुमान, गणेश, शिवजी आणि भाविकांकरीता विशालकाय वट वृक्षाखाली एक सभा मंडप आहे. याठिकाणी शिवरात्रीच्या पर्वावर पाच दिवसाची जत्रा आयोजित केली आहे.

Web Title: 'Ziri Devasthan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.