जि.प. शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: January 21, 2016 00:54 IST2016-01-21T00:54:42+5:302016-01-21T00:54:42+5:30
भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन देण्याचे अध्यादेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढले.

जि.प. शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत
शिक्षकांमध्ये संताप : १ तारखेच्या वेतनाचा पडला विसर
भंडारा : भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन देण्याचे अध्यादेश राज्याच्या शिक्षण विभागाने काढले. मात्र याला जिल्हा परिषद शिक्षण विभागाने हरताळ फासला आहे. डिसेंबर महिन्याचे वेतन अद्याप प्राप्त न झाल्याने शिक्षकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून विद्यादानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने वेळोवेळी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र येथील कार्यरत कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे प्रकरणाला हाताळताना दिरंगाई करण्यात येत असल्याने शिक्षकांचे वेतन वेळेत होण्यास विलंब होत आहे. दरम्यान राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला करण्याचे सक्त निर्देश दिले. मात्र या अध्यादेशाला हरताळ फासण्यात आले आहे. जानेवारी महिन्याची २० तारीख लोटली असतानाही डिसेंबर महिन्याचे वेतन जिल्ह्यातील शिक्षकांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. (शहर प्रतिनिधी)