जि.प. अध्यक्षांच्या वाहनचालकाचा सहृदय सत्कार

By Admin | Updated: January 1, 2017 00:57 IST2017-01-01T00:57:53+5:302017-01-01T00:57:53+5:30

अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांच्या वाहनचालकाचा सेवानिवृत्ती सत्कार करण्याचे औदार्य अलिकडे बघायला ...

Zip The conductor of the president's carriage greetings | जि.प. अध्यक्षांच्या वाहनचालकाचा सहृदय सत्कार

जि.प. अध्यक्षांच्या वाहनचालकाचा सहृदय सत्कार

 आजी-माजी पदाधिकारी उपस्थित : ३३ वर्षांची अपघात विरहित सेवा
भंडारा : अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांच्या वाहनचालकाचा सेवानिवृत्ती सत्कार करण्याचे औदार्य अलिकडे बघायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. मात्र जिल्हा परिषदेत ३३ वर्षांपासून कार्यरत वाहनचालकाचा सपत्नीक सेवानिवृत्ती सहृदय सत्कार करण्याचा प्रसंग आज शनिवारला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात बघायला मिळाली.
औचित्य होते, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांचे वाहनचालक रामलाल शेंडे यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाचा. या निरोप समारंभाला विद्यमान पदाधिकारीच नव्हे तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी उपस्थिती लावून त्यांची सेवा करणाऱ्या वाहन चालकाला उपस्थितीची अनोखी भेट दिली. रामलाल शेंडे हे ३३ वर्षापुर्वी जिल्हा परिषदेत वाहनचालक म्हणून रूजू झाले होते. बघता बघता त्यांनी ३३ वर्षे अपघातविरहीत सेवा पूर्ण केली. शनिवार त्यांची सेवानिवृत्तीची तारीख आली. जिल्हा परिषद वाहन चालकाची नोकरी सांभाळताना त्यांनी कधीही उसंत घेतली नाही. रजा न घेता व कुरबुर न करता कर्तव्य बजावले. कुठलाही सण असो वा महत्त्वाचे काम त्यांनी कर्तव्यपालन केले. वाहन चालकाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अनेक जिल्हा परिषद अध्यक्षांचे काम बघितले. आपल्या मृदू स्वभावाने ते अध्यक्षांना जवळचे वाटत होते. अशा चालकाच्या सेवानिवृत्ती सत्कारासाठी भाग्यश्री गिलोकर यांच्या कक्षात रामलाल व त्यांची पत्नी गीता शेंडे यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्याचे वाहनचालक सेवानिवृत्त झाल्याच्यादिवशी खुद्द जिल्हाधिकारी त्यांचे सारथी झाले होते. याची आठवण झाली. या कार्यक्रमाला भाग्यश्री गिलोकर, माजी अध्यक्ष वामिना तरोणे, मनोहर सिंगनजुडे, सुमेध श्यामकुंवर यांच्यासह उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती नीळकंठ टेकाम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Zip The conductor of the president's carriage greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.