जिल्हा परिषदेच्या कामांचे ‘जिओ टॅगिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:26 IST2018-08-06T22:26:39+5:302018-08-06T22:26:58+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कामांचे जिओ टॅगिंक करावे. सोबत रस्ते बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कामाची व्हिडिओग्राफी करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. जिल्हा परिषद भंडारा आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

Zio tagging work of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या कामांचे ‘जिओ टॅगिंग’

जिल्हा परिषदेच्या कामांचे ‘जिओ टॅगिंग’

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : जिल्हा नियोजनाचा १५ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कामांचे जिओ टॅगिंक करावे. सोबत रस्ते बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कामाची व्हिडिओग्राफी करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जिल्हा परिषद भंडारा आढावा बैठक जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, अर्थ व शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, समाजकल्याण सभापती रेखाताई वासनिक, आरोग्य व बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप व पंचायत समिती सभापती व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजनाच्या सर्व कामांचे प्रस्ताव १५ आॅगस्ट पुर्वी सादर करावे. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत २० आॅगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या. ३१ मार्चपर्यंत झालेल्या खर्चित व अखर्चित खर्चाचा तपशिल कारणांसह सादर करण्याच्या सूचनाही दिली. दोन हजार २५२ दुरुस्तीस आलेल्या लघुसिंचन बंधाऱ्यांच्या पुर्नरुजीवनाचे काम प्राधान्याने करावे. त्यास लागणाºया निधीचे प्रस्ताव सादर करा. त्यासाठी लागणारा वाढीव निधी जिल्हा वार्षिक योजनेतून देण्यात येईल. पावसाळयाचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचे कामास गती द्यावी. जिल्हा परिषदच्या सर्व शाळा सौर उर्जेवर आणण्यासाठी विद्युत विभागास आदेशित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सक्षम अंतर्गत लागणारे प्रोजेक्टर व साहित्य शाळांना मिळाले काय असे आमदार चरण वाघमारे यांनी विचारणा केली. त्यांबाबत समाधानकारक उत्तर देण्यात आले. जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीच्या बांधकामाचा एकत्रित आराखडा तयार करावा त्यात सोलर सहित डिजीटल शाळा, दुरुस्ती वालकंपाऊड सहित, नवीन शाळा बालकंपाऊंडसहित असा प्राधान्यक्रम लावा, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामास २१ कोटी रुपये मंजूर करण्यात येतील तसेच आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती साठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पशुसंवर्धन विभागांतर्गत दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. तसेच पशुंसाठी लागणाºया औषधांसाठी ३६ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. निधी वाटप केलेल्या सर्व विभागाचा कामाचा आढावा दर शनिवार घेण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व नळयोजना सुरु कराव्यात. दंड व्याज बाजूला करुन मुळ रकमेची १५ भागात विभागणी करुन प्रथम हप्ता भरून बंद नळ योजना सुरू करण्याचे आदेश दिले

Web Title: Zio tagging work of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.