जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे सुरू
By Admin | Updated: April 3, 2015 00:35 IST2015-04-03T00:35:43+5:302015-04-03T00:35:43+5:30
जिल्हा परिषदेतील गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या व आंतरजिल्हा बदलीबाबत अभिप्राय

जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारे सुरू
अभिप्राय मागितला : संघटनांच्या ‘से’लाही महत्त्व
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या व आंतरजिल्हा बदलीबाबत अभिप्राय पाठविण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहे. या प्रक्रियेसंदर्भात संबंधित कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधीचेसुद्धा अभिप्राय घेण्याची सूचना जिल्हा परिषद सीईओना करण्यात आली आहे.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यात अपिलीय प्राधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांना अधिकार दिले आहेत. यापूर्वी झालेल्या बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेऊन अपीलात प्रकरणे दाखल केली जातात. हा प्रकार थांबविण्यासाठी बदली पक्रियेच्या धोरणात आवश्यक ते बदल व सुधारणा करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींकडूनही सुधारणात्मक अभिप्राय मागविण्यात येणार आहे. यावरूनच नियुक्ती प्राधिकारी म्हणूनच सीईआेंनी अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्तांकडे पाठवायचा आहे. १० एप्रिलपर्यंत हा अहवाल पाठविण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिये संदर्भात धोरणात्मक बदल करण्यासाठी अभिप्राय मागविण्यात यावे याकरिता शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेवरूनच बदली प्रक्रियेच्या संदर्भातील विशेष सुधारणा देणारा आदेश २० मार्च रोजी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)
बदली प्रक्रियेवर संघटनांचे मत विचारात घ्यावे, यासाठी ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेतली. यानुसारच अहवाल मागविण्यात आले आहे.
- मधुकर काठोळे
कार्याध्यक्ष,
प्राथमिक शिक्षक संघ