जिल्हा परिषद कर्मचारी आता ‘नजर’ कैदेत
By Admin | Updated: February 9, 2015 23:07 IST2015-02-09T23:07:29+5:302015-02-09T23:07:29+5:30
जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी

जिल्हा परिषद कर्मचारी आता ‘नजर’ कैदेत
भंडारा : जिल्हा परिषद मधील काही कर्मचारी चोखपणे कर्तव्य बजावीत आहेत. तर काहींच्या बाबतीत तक्रारी होत्या. कामात सुसूत्रता यावे, व कर्मचारी कार्यालयीन कामात पारदर्शकता ठेवावे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेरातून कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात येईल.
जिल्हा परिषदेतील कर्मचारी सकाळी कर्तव्यावर आल्यानंतर सायंकाळी ५.४५ पर्यंत कार्यालयात हजर राहून कर्तव्य पार पाडणे गरजे आहे. दरम्यान त्यांना दुपारी २ वाजता अर्धा तासाचा 'लंच ब्रेक' दिल्या जातो. मात्र, अनेक कर्मचारी वेळेचा दुरूपयोग करताना आढळून येत होते. यामुळे कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्या नारिकांना कर्मचारी टेबलवर दिसून येत नसल्याने त्यांच्या कामाचा खोळंबा होत होता. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी इमारतीच्या तळमजल्याच्या मुख्य प्रवेशद्वार वगळता उर्वरीत तीन चॅनल गेट सकाळी १०.३० वाजेपासून कार्यालयीन वेळ होईपर्यंत बंद ठेवण्यात येतात.
यानंतरही कर्मचाऱ्यांचे टेबल सोडून जाण्याचा उपक्रम सुरूच असल्याने मुख्य प्रवेशद्वारावर एक कर्मचारी बसवून बाहेर जाणाऱ्यांची नोंदणी रजिस्टरमध्ये करण्यात येत आहे. आता कर्मचाऱ्याची कर्तव्यात किती पारदर्शक आहेत.
याची माहिती व्हावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत यापूर्वी चौदा सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. यात आणखी वाढ करण्यात आली असून सात नवीन कॅमेरा लावण्यात आलेले आहेत.
हे कॅमेरे मुख्य प्रवेशद्वार, व्हरांड्यात तथा काही महत्वाच्या विभागात लावण्यात आलेले आहेत. कॅमेरातून सीईओ कर्मचाऱ्यांवर नजर ठेवणार आहे. याचे नियंत्रण ते आपल्या कक्षातून करणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरामुळे आता जिल्हा परिषदमधील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांवर बारीक नजर राहणार आहे.
कॅमेरा लावण्यात आल्याने काही कर्मचाऱ्यांची मोठी गोची झाली असून काहींनी यामुळे पारदर्शक कामे होतील व कामचुकाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येणार असल्याने स्वागत केले आहे. यानंतर काही दिवसात येथील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.
(शहर प्रतिनिधी)