निधीअभावी झरी उपसा सिंचन प्रकल्प रखडला

By Admin | Updated: August 26, 2014 23:16 IST2014-08-26T23:16:05+5:302014-08-26T23:16:05+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद न केल्याने तालुक्यातील बारव्हा व दिघोरी परिसरातील हजारो हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेल्या झरी उपसासिंचन योजना प्रकल्प

Zari Laxmi Irrigation Project paused due to lack of funds | निधीअभावी झरी उपसा सिंचन प्रकल्प रखडला

निधीअभावी झरी उपसा सिंचन प्रकल्प रखडला

लाखांदूर : यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद न केल्याने तालुक्यातील बारव्हा व दिघोरी परिसरातील हजारो हेक्टर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेल्या झरी उपसासिंचन योजना प्रकल्प पुन्हा एकदा रखडला असून लोकप्रतिनिधीची उदासीनता कारणीभूत असल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवला आहे.
आंदोलन, उपोषणे व खणणी न करता केवळ राजकीय दृष्टीकोन बाळगुन भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून सिंचन क्षेत्र वाढविण्याचा कांगावा काही जनप्रतिनिधीं व लोकप्रतिनिधीकडून केला जात आहे. परंतु लाखांदूर तालुक्यातील बारव्हा व दिघोरी क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीची सिंचनाची व्यवस्था करणारा झरी सिंचन योजना मात्र निधीमुळे मागील २५ वर्षापासून रखडला आहे. दोन वर्षापुर्वी २२ एप्रिलच्या शासकीय पत्रानुसार या प्रकल्पाला २५ कोटी व त्यापेक्षा अधिक किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या सिंचन योजनेसाठी सदैव लढा देणारे चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी झरी तलावात निधी उपलब्ध झाल्याच्या कारणावरून फाटाक्यांची आतीस बाजी करून आनंद साजरा केला होता. परंतू माशी कुठे शिंकली कुणास ठावूक.
निसर्गाचे पाण्यावर अवलंबून असणारे शेतकरी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे आनंदीत झाले होते. गेल्या २५ वर्षापासून इटियाडोह धरणाचे पाणी झरी तलावात सोडून त्याभागातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार होता. अनेक नेत्यांनी या प्रकल्पासाठी आंदोलने केली.

Web Title: Zari Laxmi Irrigation Project paused due to lack of funds