शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह

By admin | Updated: January 5, 2015 22:57 IST

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या

खून झाल्याचा पित्याचा आरोप : १० दिवसांपासून होता बेपत्तासाकोली : दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या पित्याने, 'माझ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्याचा देखावा करण्यात आला आहे', असा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.वृत्त असे की, शेखर आई-वडिलांसोबत सुकळी येथे राहत होता. शिक्षणासोबतच तो पार्टटाईम नौकरी करायचा. येथील एम.बी. पटेल महाविद्यालयात बी.ए. अंत्यचा विद्यार्थी होता. २६ डिसेंबरला तो नागपूर येथे जात असल्याचे सांगून घरून निघाला. त्यानंतर तो परतला नाही. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुकळी जंगलात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही माहिती मिळताच सरपंचासह शेखरचे आई-वडिलही घटनास्थळी पोहोचले. (तालुका प्रतिनिधी)संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेहज्या झाडावर शेखरचा मृतदेह लटकविला होता. ते झाड उंचीने लहान आहे. त्याचे पाय जमिनीवर टेकलेले होते. शरीर काळे पडले असून घटनास्थळाची पाहणी केल्यावर त्याची हत्या करून मृतदेह लटकविण्याचा देखावा करण्यात आला, हे स्पष्ट दिसत होते. त्याचा खून करून मृतदेह लटकविल्याची परिसरात चर्चा आहे.