जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह

By Admin | Updated: January 5, 2015 22:57 IST2015-01-05T22:57:52+5:302015-01-05T22:57:52+5:30

दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या

Yunnan found in the forest | जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह

जंगलात आढळला तरुणाचा मृतदेह

खून झाल्याचा पित्याचा आरोप : १० दिवसांपासून होता बेपत्ता
साकोली : दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरूणाचा मृतदेह सुकळी जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. शेखर रामचंद्र निखारे रा. सुकळी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाच्या पित्याने, 'माझ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला लटकविण्याचा देखावा करण्यात आला आहे', असा आरोप पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
वृत्त असे की, शेखर आई-वडिलांसोबत सुकळी येथे राहत होता. शिक्षणासोबतच तो पार्टटाईम नौकरी करायचा. येथील एम.बी. पटेल महाविद्यालयात बी.ए. अंत्यचा विद्यार्थी होता. २६ डिसेंबरला तो नागपूर येथे जात असल्याचे सांगून घरून निघाला. त्यानंतर तो परतला नाही. रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सुकळी जंगलात त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. ही माहिती मिळताच सरपंचासह शेखरचे आई-वडिलही घटनास्थळी पोहोचले. (तालुका प्रतिनिधी)
संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
ज्या झाडावर शेखरचा मृतदेह लटकविला होता. ते झाड उंचीने लहान आहे. त्याचे पाय जमिनीवर टेकलेले होते. शरीर काळे पडले असून घटनास्थळाची पाहणी केल्यावर त्याची हत्या करून मृतदेह लटकविण्याचा देखावा करण्यात आला, हे स्पष्ट दिसत होते. त्याचा खून करून मृतदेह लटकविल्याची परिसरात चर्चा आहे.

Web Title: Yunnan found in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.