अपघातात युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: February 20, 2016 01:08 IST2016-02-20T01:08:17+5:302016-02-20T01:08:17+5:30

येथील एमआयडीसी परिसरातील बाईड बार कंपनीत काम करणारा युवक सुटी झाल्यानंतर घरी येत असतांना जवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने १७ फेब्रुवारीला धडक दिली.

Youth's death in an accident | अपघातात युवकाचा मृत्यू

अपघातात युवकाचा मृत्यू

मोहाडी येथील घटना : तीन दिवसानंतर पोलिसांची कारवाई
मोहाडी : येथील एमआयडीसी परिसरातील बाईड बार कंपनीत काम करणारा युवक सुटी झाल्यानंतर घरी येत असतांना जवळील पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने १७ फेब्रुवारीला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या युवकांचा १८ फेब्रुवारीला नागपुर येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. मात्र पोलिसांनी १९ फेब्रुवारीला कारवाईची सुरुवात केली.
मोहाडी येथील विश्वास मदन निमजे २८ वर्ष हा युवक येथील एमआयडीसी परिसरातील ब्राईड बार कंपनीत काम करीत होता. १७ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजता सुटी झाल्यानंतर आपल्या घरी सायकलने येत असतांना जवळीलच इंडियन पेट्रोल पंपासमोर मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला मागुन जोरदान धडक दिली.
यात त्याच्या सायकलचा चुराडा झाला व त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने प्रथम त्याला येथील ग्रामीण रुग्णालात नंरत भंडारा व नंतर नागपूरला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १८ फेब्रुवारीला सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. ह्या घटनेची मोहाडी पोलीस ठाण्यात कोणीच खबर दिली नाही. ग्रामीण रुग्णालयातुन पोलीसांना फोन करण्यात आला होता.
मात्र पोलिसांनी तत्परता दाखविली नाही. शेवटी १९ फेब्रुवारीला याची रितसर तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी कारवाईस सुरुवात केली.
तोपर्यंत मृतकाची सायकल व जेवनाचा डब्बा तेथे तसाच पडून होता. पोलीस पेट्रोल पंपावरील सी.सी. टीव्ही फुटेज पडताळून पाहात आहेत. तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिरीपुंजे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Youth's death in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.