कोरोनाच्या सावटातही ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरुणाईत क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:00 IST2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:00:57+5:30

दशकापूर्वी महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाइन उत्सव आता गावखेड्यांपर्यंतही पोहोचला आहे. संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत साजरा केला जाणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावरही आता या डे चे फॅड वाढल्याचे दिसत आहे. पाश्चात्य राष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा दिवस अलीकडे भारतातही ग्रामीण भागात साजरा होऊ लागला आहे. या सप्ताहाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. रोज डे हा या सप्ताहातील पहिला दिवस.

The youthful craze for 'Valentine's Day' even in the wake of Corona | कोरोनाच्या सावटातही ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरुणाईत क्रेझ

कोरोनाच्या सावटातही ‘व्हॅलेंटाईन डे’ची तरुणाईत क्रेझ

संजय साठवणे
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली :  तरुणाईला भुरळ घालणारा प्रेमाचा आठवडा सध्या सुरू असून, विविध डे साजरे करण्यात तरुण-तरुणी मग्न झाले आहेत. कोरोनाच्या सावटातही व्हॅलेंटाइन सप्ताह उत्साहात सुरू असून, विविध वस्तूंनी भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठ सजली आहे.
दशकापूर्वी महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाइन उत्सव आता गावखेड्यांपर्यंतही पोहोचला आहे. संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत साजरा केला जाणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावरही आता या डे चे फॅड वाढल्याचे दिसत आहे. पाश्चात्य राष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा दिवस अलीकडे भारतातही ग्रामीण भागात साजरा होऊ लागला आहे. या सप्ताहाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. रोज डे हा या सप्ताहातील पहिला दिवस. गुलाबपुष्प देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न तरुणाई करतात. ८ फेब्रुवारीला प्रपोज डे, ९ फेब्रुवारीला चाॅकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, ११ फेब्रुवारीला प्राॅमीस डे, १२ ला किस डे, १३ ला हग डे आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
प्रेमी युगुलच नव्हे तर विविध नागरिकही हा दिवस साजरा करीत असल्याचे अलिकडे दिसत आहे. प्रेम करण्यासाठी सगळेच दिवस महत्त्वाचे असले तरी या काळात मात्र याला बहर येतो; परंतु यंदा कोरोना सावटामुळे शाळा - महाविद्यालय बंद असल्याने तेवढा उत्साह दिसत नाही; परंतु शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलल्याचे दिसून येत आहे. 
भंडारा, साकोली, तुमसर येथेही मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आले आहेत. तरुण-तरुणी गत दोन-तीन दिवसांपासून सप्ताह साजरा करण्यासाठी विविध वस्तुंची खरेदी करीत आहेत. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची तयारी अनेकांनी चालविली असली तरी कोरोनामुळे त्याला अनेक निर्बंध येणार आहेत.

प्रेमाचे प्रतीक गुलाब फुलांना मागणी वाढली
 व्हॅलेंटाइन सप्ताहाचा पहिला मान प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबाचे फुल आहे. त्यामुळेच सर्वत्र रोज डे साजरा केला जातो. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रेमीजीव आपल्या जीवलगासाठी गुलाबी गुलाबाचे फुल खरेदी करतात. काही जण पिवळा, पांढरा आणि इतरही रंगाचे गुलाब खरेदी करतात. रंगावरून प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.

 

Web Title: The youthful craze for 'Valentine's Day' even in the wake of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.