‘त्या’ तरुणाची उपचारासाठी सेवाग्रामला रवानगी

By Admin | Updated: September 26, 2015 00:40 IST2015-09-26T00:40:19+5:302015-09-26T00:40:19+5:30

जर्जर आजाराने त्रस्त युवकाला उपचारासाठी भाजपचे पदाधिकारी व आमदार चरण वाघमारे धावून आले.

'The youth will be sent to Sevagram for treatment | ‘त्या’ तरुणाची उपचारासाठी सेवाग्रामला रवानगी

‘त्या’ तरुणाची उपचारासाठी सेवाग्रामला रवानगी

वरठी : जर्जर आजाराने त्रस्त युवकाला उपचारासाठी भाजपचे पदाधिकारी व आमदार चरण वाघमारे धावून आले. सेवाग्राम येथे उपचारासाठी आ. वाघमारे यांच्या सुचनेनुसार त्याचे मदतीकरीता संबंधित आरोग्य विभागाला लिहलेले पत्र आणि २,५०० रूपयांची मदत देऊन महाराष्ट्र एक्सप्रेसने रवानग करण्यात आले.
हनुमान वॉर्ड येथील ललीत दाभनकर या युवकाला दुर्धर आजाराने ग्रासले. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचाराचा खर्च पेलवत नव्हता. व्यसनामुळे ३० व्यावर्षी ललीत मरणावस्थेत आला होता. याबाबत माहिती मिळताच आमदार चरण वाघमारे यांनी त्या युवकाचे घर गाठले. प्रकरण समजून घेतले व त्याला सर्वाेतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आ.वाघमारे यांनी शब्दानुसार या युवकाच्या उपचाराकरीता सेवाग्राम येथील दवाखान्याच्या व्यवस्थापनाशी स्वत: बोलले आणि उपचार करण्याकरीता आग्रहाचे पत्र लिहून त्या युवकाला उपचारासाठी सेवाग्राम येथे पाठवण्यात आले.
उपचार मोफत होणार असले तरी ललीतच्या वडिलाजवळ खर्चापुरते पैसे नव्हते म्हणून वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, मोहाडी पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व भाजपचे सैनिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद धारगावे यांनी स्वत: जवळचे २,५०० रूपये दिले. आज सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने ललीत व त्याचे वडील शालिक दाभनकर यांना सेवाग्राम येथे पाठवण्यात आले. यावेळी विरेंद्र देशमुख, पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे, अरविंद येळणे, बंडू निंबार्ते, भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
वाहनाच्या धुराने त्रस्त
आसगाव : वाहनांमध्ये होणाऱ्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती बळावली आहे. ग्रामीण भागातून शहराकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या आॅटोत रॉकेलचा सर्रास वापर होत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आॅटो चालक खेड्यातील विक्रेत्यांकडून जादा पैसे देऊन रॉकेलची खरेदी करतात. (वार्ताहर)

Web Title: 'The youth will be sent to Sevagram for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.