तरुणाने वाचविले बैलाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:24 IST2018-05-14T23:24:25+5:302018-05-14T23:24:36+5:30
रस्त्याने जाताना दोन बैल एकमेकांवर तुटून पडले. अशातच या झुंजीत हे दोन्ही बैल जमिनीला समतल असलेल्या एका विहीरीत पडले. विहीरीत जास्त पाणी नव्हते. तोवर बैल विहीरीत पडल्याची वार्ता गावात पसरली. या बैलांना विहीरीतून बाहेर काढायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला.

तरुणाने वाचविले बैलाचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्त्याने जाताना दोन बैल एकमेकांवर तुटून पडले. अशातच या झुंजीत हे दोन्ही बैल जमिनीला समतल असलेल्या एका विहीरीत पडले. विहीरीत जास्त पाणी नव्हते. तोवर बैल विहीरीत पडल्याची वार्ता गावात पसरली. या बैलांना विहीरीतून बाहेर काढायचे कसे? असा प्रश्न अनेकांना पडला. शर्थीचे प्रयत्न सुरू झाले परंतु विहीरीत उतरण्यासाठी कुणी तयार नव्हता. अखेर किशोर पंचभाई नामक तरूणाने दोरखंडाच्या माध्यमातून विहीरीत उतरला आणि जेसीबीच्या सहाय्याने या बैलांना बाहेर काढण्यात यश आले.
पवनी तालुक्यात रविवारला कन्हाळगाव येथे जांभुळे नामक शेतकऱ्याचे दोन बैल दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावातीलच एका विहिरीत पडले. ही माहिती किशोर पंचभाई यांना कळली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी ५ वाजता कन्हाळगाव गाठले. विहिरीतील बैल काढण्यासाठी गावकºयांसोबत प्रयत्न केले. परंतु विहिरीतील बैल काढण्यात सर्वांना अपयश आले. त्या विहीरीला कड्या नव्हत्या. त्यामुळे विहीरीत उतरणार कोण? असा प्रश्न सर्वांसमोर होता. सरतेशेवटी कुणी तयार न झाल्यामुळे किशोर पंचभाई हे स्वत: कमरेला दोर बांधून विहिरीत उतरले.
दोरखंडाच्या बळावर त्यांनी विहिरीतील पाण्यात उतरून दोन्ही बैलांना दोर बांधला. एक-एक करीत दोन्ही बैलांना जिवंत बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गावकºयांनी किशोरच्या हिमतीला दाद देत कौतुक केले.