तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST2021-05-03T04:30:14+5:302021-05-03T04:30:14+5:30

लाखोरी येथील घटना लाखनी : तालुक्यातील लाखोरी येथील गावतलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या ...

Youth drowns in lake | तलावात बुडून युवकाचा मृत्यू

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

लाखोरी येथील घटना

लाखनी : तालुक्यातील लाखोरी येथील गावतलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रोहित ग्यानीराम टिचकुले (१८) रा. लाखोरी असे मृताचे नाव आहे.

रोहित हा गत दहा वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. तो रविवारी सकाळी गावतलावात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने व त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सकाळी १० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह तरंगताना दिसून आल्याने घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय हेमणे, पोलीस हवालदार जतिन दासानी, पोलीस शिपाई नितीन झंझाड यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून तपास पोलीस हवालदार दिगांबर तलमले, पोलीस शिपाई अनिल राठोड करीत आहेत.

Web Title: Youth drowns in lake