दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जखमी

By Admin | Updated: March 18, 2015 00:45 IST2015-03-18T00:45:20+5:302015-03-18T00:45:20+5:30

आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना सुकळी (नकुल) देवरी (देव) मार्गावरील नाल्यानजीक मोटर सायकलला अपघात झाला.

Youth dies in bike accident; Two injured | दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जखमी

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जखमी

चुल्हाड (सिहोरा) : आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना सुकळी (नकुल) देवरी (देव) मार्गावरील नाल्यानजीक मोटर सायकलला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारला सायंकाळी ७ वाजता घडली. सुरज नान्हे (३५) रा.देवरी (देव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तुमसर तालुक्यातील सुकळी (नकुल) या गावी सोमवारला आठवडी बाजार असल्याने देवरी (देव) येथील सूरज नान्हे (३५), संजय नागपुरे (२८), शास्त्री नेवारे (३५) हे तिघे बाजारात खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरु झाल्याने तिघांनी गावाकडे परतण्यासाठी आठवडी बाजारात उशिर केला. परंतु तासभरानंतर पावसाची रिपरीप थांबत नसल्याने सायंकाळी ७ वाजता गावाकडे परतण्यासाठी तिघे निघाले. संजय नागपुरे यांच्या मालकीची एम.एच. ३६ डी २२८३ या क्रमांकाची ही मोटर सायकल होती.
(देव) गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आल्यानंतर नाल्यानजीक त्यांच्या मोटर सायकलला वन्य प्राणी वानडुकरांचा कळप त्यांना मार्गावरून आडवा जात होता. त्यांना वाचविण्यासाठी संजयने ब्रेक दाबला. यात संतुलन बिघडल्याने डांबरीकरण रस्त्यावर तिघेही आदळले. यात सूरज नान्हे (३५) या तरुणाा जागीच मृत्यू झाला. तर काही अंतरावर संजय आणि शास्त्री नामक तरुण फेकल्या गेले. यात संजयच्या डोक्याला जबर जखम झाल्याने त्याला नागपुरला हलविण्यात आले. तर शास्त्री नामक तरुणाला हात आणि डोक्याला दुखापत झाली असून सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. मृतक सूरज नान्हेचे शव शवविच्छेदनासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तपास ठाणेदार रमेश इंगोले करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Youth dies in bike accident; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.