युवक हा देशाचा कणा!

By Admin | Updated: March 22, 2017 00:38 IST2017-03-22T00:38:38+5:302017-03-22T00:38:38+5:30

युवक हा देशाचा कणा आहे. आणि आपला, भारत देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे आजचा युवक तंत्रस्नेही होऊन शेतीत जर आला ....

The youth of the country! | युवक हा देशाचा कणा!

युवक हा देशाचा कणा!

शामकुंवर याचे प्रतिपादन : लाखनीत कृषी महोत्सव
लाखनी : युवक हा देशाचा कणा आहे. आणि आपला, भारत देश कृषी प्रधान आहे. त्यामुळे आजचा युवक तंत्रस्नेही होऊन शेतीत जर आला तेव्हा देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन कृषी वैज्ञानिक जी. आर. शामकुंवर यांनी व्यक्त केले.
स्थानिक समर्थ नगरच्या मैदानावर एग्रोटेक कृषी महोत्सवाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मंचावर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ शेतकरी इस्तारी कापगते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अविनाश ब्राम्हणकर, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, व्यवस्थापक करण रामटेके, अर्बन बँक संचालक पप्पु गिऱ्हेपुंजे, रामकृष्ण वाढई, वसंता शेळके, यादवराव कापगते, पप्पु फरांडे, अतुलपाटील भांडारकर, रमेश खेडकर, डॉ. खोब्रागडे, सुखदेव तरोळे, बाळा शिवणकर, अंबादास नागदेवे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तिन दिवसीय महोत्सवाचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शनपर भाषणात चौधरी यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय करुन आर्थिक उन्नती करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. श्यामकुंवर यांनी धानाच्या विविध प्रजातीचा उपयोग करुन उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक संयोजक विशाल भोयर यांनी केले. कार्यक्रमठिकाणी शेती उपयोगाचे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The youth of the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.