विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:36+5:302021-02-23T04:53:36+5:30

लाखांदूर : घरातील कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर पडून एका युवकाने गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ...

Youth commits suicide by jumping into a well | विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

लाखांदूर : घरातील कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर पडून एका युवकाने गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदर घटना तालुक्यातील कोच्छी/दांड़ेगाव येथील ग्रा.पं.कार्यालयालगतच्या विहिरीत २१ फेब्रु. रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.राजकुमार मनोहर सेलोटे (३३) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

पोलिस सूत्रानुसार, घटनेच्या रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना मृतक घराबाहेर पडताना खुद्द वडिलांना दिसून आला. यावेळी वडिलांनी त्याला आवाज देत हटकल्याची माहिती देण्यात आली. मात्र मृत युवकाने वडिलांचा आवाज ऐकूनदेखील थेट गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील भागातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. यावेळी युवकाचा पाठलाग करताना सदर घटना वडिलांच्या लक्षात येताच संबंधितांनी आरडाओरड करुन गावकऱ्यांसह दिघोरी पोलिसांना माहिती दिली.

माहितीवरुन दिघोरी पोलिस ठाण्याचे सहायक ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस नायक कष्णा भुते, पोलिस अंमलदार सतीश शिंगणजुडे यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, लाखांदूर तालुक्यातील या महिन्यातील युवकाची ही तिसरी आत्महत्या असून या आत्महत्येचे कारणदेखील अस्पष्ट असल्याचे बोलल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास येथील सहायक ठाणेदार नीलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Web Title: Youth commits suicide by jumping into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.