युवक,महिलांना अंनिस सोबत जोडा
By Admin | Updated: September 25, 2014 23:19 IST2014-09-25T23:19:32+5:302014-09-25T23:19:32+5:30
आजचा युवक हा वैज्ञानिक युगात जुनाट चालीरिती मध्ये भरकटलेला आहे. त्याला अधिक विज्ञाननिष्ठ व जबाबदार युवक बनण्याकरिता तसेच महिलांमध्ये अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने

युवक,महिलांना अंनिस सोबत जोडा
अंनिसची सभा : जिल्हा संघटक वसंत लाखे यांचे प्रतिपादन
लाखनी : आजचा युवक हा वैज्ञानिक युगात जुनाट चालीरिती मध्ये भरकटलेला आहे. त्याला अधिक विज्ञाननिष्ठ व जबाबदार युवक बनण्याकरिता तसेच महिलांमध्ये अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने जास्तीत जास्त संख्येने महिलांना व युवकांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये जोडावे, असे आवाहन अखिल भारतीय अंनिसचे जिल्हा संघटक वसंत लाखे यांनी लाखनी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आयोजित सभेत केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष व लाखनी तालुका संघटक प्रा.अशोक गायधने यांनी प्रास्ताविक करून लाखनी शाखेचा कार्यवृत्तांत सादर केला. मुंबई येथील राज्य अभा अंनिसच्या दोन दिवसीय शिबिराचा उपस्थिती व कार्य अहवाल याचे सभेत प्रा.अशोक गायधने यांनी सादर केला. जिल्हा कार्यअहवाल नामदेव कान्हेकर यांनी सादर केला.लाखनी तालुका माहिला संघटीका शिवानी काटकर यांनी महिलांच्या अंधश्रद्धाविषयक परिस्थितीबद्दल मनोगत व्यक्त केले. या सभेत जिल्हा संघटक वसंत लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सहा विषयावर चर्चा करण्यात येऊन लाखनी तालुक्यात विविध शाळा महाविद्यालयात वैज्ञानिक प्रबोधन कार्यक्रम व युवा अंनिसच्या गठण करण्यावर जोर देण्यात आला. त्याचप्रमाणे संघटन बांधणी, सभासद नोंदणी आदी बाबीवर चर्चा करण्यात आली. या सभेत प्रा.मधुकर तुरकाने, सी.जी. लेंढारे, लवकुश पांडे, सुमन कान्हेकर, अशोक वैद्य, छाया गायधनी यांच्यावर सभासद नोंदणी सोबत विविध प्रबोधन कार्यक्रमाची जबाबदारी टाकण्यात आली. आभार तालुकाध्यक्ष नामदेव कानेकर यांनी मानले. यशस्वितेकरिता नितीन पटले, तेजस हनवतकर, वैभव चौधरी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)