सखी सदस्य नोंदणी आपल्या दारी
By Admin | Updated: January 14, 2015 23:03 IST2015-01-14T23:03:41+5:302015-01-14T23:03:41+5:30
लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती,

सखी सदस्य नोंदणी आपल्या दारी
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे दि. १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता पासून तालुक्यातील एकूण ११ वॉर्डात प्रथमच एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. वय १८ वर्षे पूर्ण असणाऱ्या युवती, महिला सदस्य नोंदणी करू शकतात. अशा प्रकारची नोंदणी भंडारा शहरात लोकमततर्फे प्रथमच आयोजित करण्यातयेत आहे. तरीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेवून सदस्य नोंदणी आरक्षित करावी. सदस्य नोंदणी नंतर लगेच मोठ्या कार्यक्रमांना सुरवात करण्यात येणार आहे.
प्रत्येक सदस्यांकडून ३५० शुल्क आकारण्यात येणार आहे. नोंदणीच्या वेळी ५०० रूपये किंमतीची कढई सेट, एक लाख रूपये किंमतीचा अपघाती मृत्यू विमा, १०० रूपये किंमतीचे माय डायफूड, राज्यस्तरीय लकी ड्रामध्ये कार जिंकण्याची संधी, सुवर्ण स्पर्शतर्फे गोल्ड प्लेटेड बांगड्या नागपूरहून प्राप्त करता येतील. आकर्षक ओळखपत्र, इंद्रायणी टेक्नीकल इंन्स्टीट्यूटतर्फे विविध कोर्सेस नि:शुल्क़ शिकविण्यात येणार आहे. यात बेकरी कोर्स, डाय करणे, ब्लॉक प्रिंटींग, ब्युटीपार्लर कोसेस, सिरॅमिक, मेहंदी यापैकी. कमला डिजिटल स्टुडियोकडून फोटो फ्री. अधिक माहितीकरीता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), यांच्याशी संपर्क साधवा. (मंच प्रतिनिधी)