तरुणांनी वाचविले त्यांचे प्राण

By Admin | Updated: February 6, 2016 00:34 IST2016-02-06T00:34:32+5:302016-02-06T00:34:32+5:30

राष्ट्रीय महामार्गावर वाहन अनियंत्रित झाल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य व त्यांचे दोन चिमुकले वाहनावरून पडले.

Young people saved their lives | तरुणांनी वाचविले त्यांचे प्राण

तरुणांनी वाचविले त्यांचे प्राण

भंडारा : राष्ट्रीय महामार्गावर वाहन अनियंत्रित झाल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य व त्यांचे दोन चिमुकले वाहनावरून पडले. त्या चौघांनाही शासकीय रूग्णालयात नेऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला. वेळीच औषधोपचार झाल्याने अपघातग्रस्तांचे प्राण वाचले.
तिरोडा येथील भिमटे कुटुंब शुक्रवारला दुचाकीने भंडाऱ्यात येत होते. दुचाकीचालक भिमटे (३२) यांच्यासोबत पत्नी (२७), चार वर्षाची मुलगी, आठ वर्षाचा भाचा सोबत होते. दरम्यान २.३० वाजताच्या सुमारास कारधाजवळील एका कॉन्व्हेंटसमोर त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने ते चारही जण खाली पडले. पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सुमित साखरकर, हरीश हुकरे, इरशाद पठाण आणि चंद्रशेखर खैरे हे विद्यार्थी तिथून जात होते. त्याने त्यांना स्वत:च्या दुचाकीवर बसवून जिल्हा सामान्य रूग्णालयात घेऊन गेले. डॉ. माधुरी मेश्राम यांनी त्यांच्यावर औषधोपचार केले.

Web Title: Young people saved their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.