वैनगंगेत बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:52+5:302021-04-02T04:36:52+5:30
लाखांदूर : वाघोबा देवस्थान तपाळ येथील जंगलातून पार्टी करुन घरी परतताना वैनगंगा नदीत पोहण्याची जिद्द एका तरुणाच्या जीवावर बेतली. ...

वैनगंगेत बुडून तरुणाचा मृत्यू
लाखांदूर : वाघोबा देवस्थान तपाळ येथील जंगलातून पार्टी करुन घरी परतताना वैनगंगा नदीत पोहण्याची जिद्द एका तरुणाच्या जीवावर बेतली. खैरना येथे नदीपात्रात बुडून गवराळा येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
प्रकाश दामोधर चौधरी (२५) रा.गवराळा ता.लाखांदूर असे मृताचे नाव आहे. तो गावातील काही मित्रांसोबत मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोबा देवस्थान येथे पार्टीसाठी गेला होता. सायंकाळी परत येत असताना खैरना घाटावर डोंग्याच्या साहाय्याने नदी पार करीत होते. त्यावेळी पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला. मात्र खोल पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहिम जारी करण्यात आली. तेव्हा बुधवारी प्रकाशचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.