शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतीसाठी कर्ज घेऊन ते फेडू न शकल्यामुळे त्या विवंचनेत एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पवनी तालुक्यातील वाही येथे गुरूवारच्या रात्री उघडकीस आली. दरम्यान, शुक्रवारला उत्तरीय तपासणीनंतर तातडीची मदत मिळावी यासाठी मृतदेह सकाळी ९.३० वाजता पवनी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मदत घोषित होईपर्यंत ...

ठळक मुद्देपवनी तालुक्यातील वाही येथील घटना : मृतदेह साडेपाच तास तहसील कार्यालयात, आमदारांविरूद्ध ग्रामस्थांत रोष

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतीसाठी कर्ज घेऊन ते फेडू न शकल्यामुळे त्या विवंचनेत एका तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पवनी तालुक्यातील वाही येथे गुरूवारच्या रात्री उघडकीस आली. दरम्यान, शुक्रवारला उत्तरीय तपासणीनंतर तातडीची मदत मिळावी यासाठी मृतदेह सकाळी ९.३० वाजता पवनी तहसील कार्यालयात नेण्यात आला. मदत घोषित होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका संतप्त लोकांनी घेतल्यामुळे पवनीत काही काळ तणावाचे वातावरण होते. साडेपाच तास मृतदेह तहसील कार्यालयात होता. परंतु स्थानिक आमदार रामचंद्र अवसरे हे गावात असूनही घटनास्थळी न आल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला.सोमेश्वर लक्ष्मण कोकुड्डे (३७) रा.वाही असे मृत शेतकºयाचे नाव आहे. वाही येथे तीन भावांचा संयुक्त कुटुंब असून सोमेश्वरला पत्नी जयश्री, मुलगी प्रांजली (५) मुलगा अखिल (२), दोन अविवाहित भाऊ आहेत. लहाणपणी आईवडील वारल्यामुळे दोन्ही भावांचा सांभाळ सोमेश्वरने केला होता. कोकुड्डे यांनी सहा एकर जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकेकडून दीड लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. ते कर्ज थकीत होते. याचवेळी कृषी पंपाचे ३९ हजार रूपयांचे बील आले. आधीच कर्ज असल्यामुळे पुन्हा कर्ज मिळणार नाही, बिल न भरल्यास कृषी पंपाची जोडणी कापल्या जाईल अशातच २५ एप्रिलला होणाºया लहान भावाच्या लग्नाचा खर्च कसा करावा या विवंचनेत या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती.दरम्यान, या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात मृतदेह आणला. तिथे माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, आझाद शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई, प्रकाश पचारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर तेलमासरे, माजी सभापती विकास राऊत, माजी सभापती हंसा खोब्रागडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.अनिल धकाते, शिवा फंदी, किशोर गोटाफोडे यांनी उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे यांच्याशी तातडीची मदत मिळावी यासाठी चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर टिक्कस, तहसीलदार गजानन कोकुड्डे उपस्थित होते. त्यानंतर माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मदत मिळेपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून तातडीची मदत, शासकीय अनुदान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले पवनीत येत असल्याची माहिती होताच पुन्हा अर्धा तास मृतदेह तिथेच ठेवण्यात आला. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. परिस्थितीचा सामना करावा. खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या लोकांना धडा शिकवून त्यांनी आत्महत्या केली पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करा, असे आवाहन पटोले यांनी केले. त्यानंतर दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयातून मृतदेह वाही येथे हलविण्यात आले.